sowning esakal
जळगाव

100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नये : कृषी विभाग

शेतकऱ्यांनी दुबार पेरणीचे नुकसान सध्या पेरण्या करू नये, असा सल्ला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात पावसाने जून महिन्यात ओढ दिली आहे. यामुळे आता पेरण्या केल्या, तर दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी दुबार पेरणीचे नुकसान टाळण्यासाठी शंभर मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नये, असा सल्ला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी दिला आहे.

हवामान विभागाने लवकर पावसाचा अंदाज व्यक्त करूनही जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाला आहे. यामुळे पेरण्याची घाई शेतकऱ्यांनी करू नये. गेल्या रविवारी (ता. १९) शहरात चांगला पाऊस झाला. यामुळे जमिनीतील उष्णता निघण्यास मदत झाली. मात्र, पेरण्यायोग्य पाऊस झालेला नाही. २० जुलैपर्यंत खरिपाच्या पेरण्या होऊ शकतात. वाटल्यास शेतकऱ्यांनी इतर पिके घ्यावीत.

जिल्ह्यात नगदी पीक म्हणून कापूस आहे. सर्वच शेतकऱ्यांचा कापूस लावण्यावर भर असतो. बागायतदार शेतकऱ्यांकडे पाणी असल्याने त्यांनी कापसाची पेरणी केली. मात्र, ज्यांची शेती कोरडवाहू आहे, अशांनी कापसाची लागवड चांगला पाऊस झाल्याशिवाय करू नये, अन्यथा बियाणे वाया जाण्याची भिती आहे.

आतापर्यंत झालेला पेरण्या अशा

- कापूस : ९३ हजार ६०० हेक्टर

- ऊस :२१ हजार हेक्टर

- मका : १८ हजार हेक्टर

एकूण : ९७ हजार हेक्टर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Liquor Tragedy : धक्कादायक उलगडा! गावठी दारूचा एकच घोट कसा ठरतो मृत्यूचं कारण? आतली भयावह प्रक्रिया वाचा

Mukesh Ambani: 1 रुपयाही पगार नाही, तरी देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती! मुकेश अंबानींची कमाई नेमकी कशी होते?

RCB विरुद्ध घरच्या मैदानात फायनल! गुजरातचा प्लॅन काय, कसा खेळणार संघ? शुभमन गिलने केला खुलासा

मी सगळं सोडूनच गेलेलं... लग्नानंतर अभिनय करणार नव्हती मृणाल दुसानिस; बाळ झाल्यानंतर का बदलला निर्णय?

Latest Marathi Update Live: कांदा खरेदीत नवा पेच; परवान्याअभावी शेतकऱ्यांसमोर अडचणींचे सावट

SCROLL FOR NEXT