District Collector Ayush Prasad speaking at the meeting of Animal Cruelty Prevention Committee on Wednesday. esakal
जळगाव

Jalgaon News : भटक्या श्‍वानांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्ह्यातील भटक्या श्‍वानांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत व पशुसंवर्धन विभागाने संयुक्तपणे विशेष मोहीम राबवावी, अशी सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी बुधवारी (ता. १) येथे केली.

प्राणीप्रेमी नागरिकांनी श्‍वान व मांजरांचे पालकत्व घ्यावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. (special drive in district to control number of stray dogs jalgaon news)

जिल्हा प्राणी क्रूरता क्लेश प्रतिबंधक सोसायटीच्या बैठकीस जिल्हाधिकारी आयुष प्रसाद अध्यक्षस्थानी होते. या वेळी ते बोलत होते. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्यामकांत पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील २१ गो-शाळांचा आढावा घेण्यात आला.

अन्यथा फौजदारी गुन्हा

प्रसाद म्हणाले, की शहरात महापालिका, नगरपालिकेने भटक्या श्‍वानांची नसबंदी करण्याची विशेष मोहीम मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करावी. गावस्तरावर ही मोहीम ग्रामपंचायतीतर्फे उपलब्ध निधीतून राबविण्यात यावी.

नागरिकांनी मुक्या प्राण्यांवर प्रेम व दया भावना दाखवावी. वाहतुकीसाठीच्या जनावरांना मारहाण, चटके देणे, जखमा अथवा कुठल्याही प्रकारची छळवणूक होत असल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.

बैलगाडीला टायरची चाके लावल्यास बैलांना कष्ट कमी होतील. जळगाव शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने बैलगाडी बनविणाऱ्या कारागिरांना अशा प्रकारचे ‘मॉडेल' तयार करून द्यावे. पशुसंवर्धन विभागाकडून जिल्ह्यातील पेट शॉप आणि डॉग ब्रिडर यांनी त्यांची अधिकृत नोंदणी करून घेणे आवश्यक आहे.

पशुकल्याणाबाबत जनजागृती करण्यात यावी. जिल्ह्यात मांजर दत्तक घेण्याबाबत आवाहन करून पालकत्व स्वीकारण्यास प्रोत्साहित करावे. शिवाय, जिल्ह्यातील सर्व जनावरे व म्हैस बाजारात शासकीय अधिकृत बारा अंकी बिल्ला (जनावरांचे आधारकार्ड) देऊन खरेदी-विक्री व्यवहार करावेत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT