crime news  esakal
जळगाव

ST महामंडळाच्या लिपीकाचा गळा दाबुन लूटमार

- रईस शेख

जळगाव : ड्युटीवरुन मध्यरात्री घरी जात असताना समोरून येणाऱ्या दोघांनी एकाचा गळा दाबून त्याला लुटल्याची घटना शिवाजीनगरातील ख्रिश्‍चन स्मशानभूमीजवळ घडली. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील शिवाजीनगर परिसरातील वज्रेश्‍वरी मंदिराजवळ वाल्मीक मोरे (वय ४३) वास्तव्यास आहे. ते एटी महामंडळात लिपिक पदावर नोकरीस असून मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घरी पायी जात होते. यावेळी ख्रिश्‍चन स्मशानभूमीजवळून जात असताना त्यांच्या समोर दोन व्यक्ती आले.

त्यांच्यातील एकाने मोरे यांचा गळा दाबून धरला तर दुसऱ्याने मागून हात घट्ट पकडून ठेवले. यावेळी त्यातील एकाने मोरे यांच्या खिशातील दहा हजार रुपयांचा मोबाईल व पाचशे रुपये रोख असे काढून घेत पसार झाले. याप्रकरणी रविवारी (ता. ५) वाल्मीक मोरे यांनी शहर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईला पुढील 48 तास धोक्याचे! गणरायाच्या आगमनापूर्वी पावसाचा अलर्ट, हवामान खात्याकडून मोठी अपडेट

US Open Final: अल्काराझला हरवलं, टियाफोलाही धुतलं! बेन शेल्टन US Openच्या फायनलमध्ये; २२ वर्षांनंतर अमेरिकेचा खेळाडू इतिहास रचणार?

BRICS Dinner: शी जिनपिंग मोदींच्या मेजवानीला गैरहजर; पुतिनसह ब्रिक्स नेत्यांनी घेतला भारतीय शाकाहारी पदार्थांचा आस्वाद, मेनू काय होता?

Pune Kolhapur Highway Traffic : गणेशोत्सवाच्या गर्दीने खंबाटकी घाटात वाहतूक कोंडी; पाच तासांचा प्रवास दहा तासांवर

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज! सांगलीतील ४ हजार ९९ लाभार्थ्यांची दुसरी कर्जमाफी यादी प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT