जळगाव : नेरीनाका स्मशानभूमीजवळील एस.टी. वर्कशॉपच्या आवारात जुन्या बसेसच्या दुरुस्तीनंतर शिल्लक भंगार साहित्यातील अल्युमिनीअम व लोखंडी पत्रा भिंतीवरून बाहेर फेकत चेारून नेण्याचा चोरट्यांचा डाव फसला. आतून भंगार बाहेर फेकणाऱ्या चोरटा तावडीत सापडला असून, त्याचा साथीदार मात्र पसार होण्यात यशस्वी ठरला. (ST Workshop theft during day thief caught while throwing garbage over wall Latest Jalgaon News)
राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीचे वर्कशॉप नेरीनाका स्मशानभूमीजवळ आहे. वर्कशॉपमध्ये एस.टी. वाहनांची दुरुस्ती होते. वाहने दुरुस्तीदरम्यान निघणाऱ्या जुने भंगाराची साठवणूक आवारातच करण्यात येते. मंगळवारी (ता. २०) दुपारी दोनच्या सुमारास वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांची मधली सुटी झाल्यावर भिंतीवरून चढून एक चोरटा आवारात शिरला. त्याचा साथीदार भिंतीच्या पलीकडेच उभा राहिला.
आतील चोरट्याने भिंतीवरून बाहेरच्या बाजूला भंगार फेकण्यास सुरवात केली. भिंतीच्या पलीकडे बऱ्यापैकी भंगार गोळा झाले असताना, चोरटे पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, कर्मचारी अशोक सोनवणे यांना वर्कशॉपमध्ये चोरी होत असल्याचे आढळून आले. त्यांनी तत्काळ सुरक्षारक्षकासह सहाय्यक यंत्र अभियंता राकेश देवरे यांना कळविले.
कर्मचाऱ्यांनी धाव घेत आवारातून भंगार बाहेर फेकरणाऱ्या भामट्याला जागेवरच पकडले. त्याची चौकशी करता, त्याने शंकर विश्वनाथ साबने (रा. गेंदालाल मिल), असे त्याने नाव सांगितले. त्याला त्याला एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार
वर्कशॉपमध्ये चोरी करताना पकडलेला शंकर साबने चोरी-घरफोडीच्या गुन्ह्यात पारंगत असून, त्याच्याविरुद्ध तब्बल ११ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला हद्दपार केले होते. हद्दपारीत असतानाही त्याला चोरी करताना पकडले होते. त्याला न्यायालयात हजर केले असता, त्याची कोठडीत रवानगी झाली आहे. पोलिस नाईक सुनील सोनार तपास करीत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.