State President of Nationalist Women Alliance adv rohini khadse jalgaon news esakal
जळगाव

Rohini Khadse News : राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी ॲड. रोहिणी खडसे; जळगावसह खानदेशला मान

सकाळ वृत्तसेवा

Nationalist Women Alliance : राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यपदी ॲड. रोहिणी एकनाथ खडसे यांची निवड करण्यात आली. मंगळवारी (ता. २९) मुंबई येथील पक्षाच्या कार्यालयात झालेल्या सभारंभात पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते त्यांना नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले. (State President of Nationalist Women Alliance adv rohini khadse jalgaon news)

गेल्या वर्षी एकनाथ खडसे यांना विधान परिषदेचे सदस्यत्व दिल्यावर ॲड. रोहिणी यांना प्रदेशाची मोठी जबाबदारी दिल्याने खडसेंचे पक्षातील महत्त्व आणखीच वाढल्याचे मानले जात आहे.

प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे, महिला आघाडीच्या मावळत्या प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, विधान परिषदेतील पक्षाचे गटनेते आमदार एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे, पक्षाचे ज्येष्ठ नेते हेमंत टकले आदी उपस्थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ॲड. रोहिणी खडसेंचा परिचय

ॲड. रोहिणी खडसे या उच्चशिक्षित असून, त्यांनी मुंबई विद्यापीठातून विधी अभ्यासक्रमाची पदवी, तर पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. जळगाव जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा असून, विद्यमान संचालिका आहेत.

त्या आदिशक्ती मुक्ताई सहकारी सूतगिरणीच्याही अध्यक्षा आहेत. संत मुक्ताबाई साखर कारखान्यात त्या मानद उपाध्यक्षा असून, विविध पदांची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे.

"माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्तीवर पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी प्रयत्नांची पराकाष्ठा करीन. पक्षाचे संघटन मजबूत करण्यावर माझा भर राहील. राज्यातील महिलांना बळ देण्यासाठी, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी या संधीचा वापर करीन." - ॲड. रोहिणी खडसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT