Republic Day 2023  esakal
जळगाव

Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिवसाला आत्मदहन, अन्नत्याग; पोलिस यंत्रणेचा ताण वाढणार

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर (जि. जळगाव) : न्याय्य, हक्कांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे, न्यायासाठी अविरत संघर्ष करीत असलेल्या तालुक्यातील काहींना प्रशासनाकडून अक्षम्य टोलवाटोलवी करत वाटाणाच्या अक्षता लावण्यात आलेल्या आहेत. (stress on police Administration on republic day due to Self immolation abstinence food by some people jalgaon news)

अशी काही क्षुब्ध मंडळी आपल्याला न्याय मिळावा म्हणून प्रजासत्ताक दिनी आत्मदहन, अन्नत्याग करण्याच्या तयारीत आहेत. काही अप्रिय घटना घडू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी तालुका प्रशासन, पंचायत समिती आणि पोलिस दलापुढे मोठा ताण असणार आहे.

तालुक्यातील धानोरा-भोरटेक येथील ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक यांनी केलेल्या भ्रष्टाचाराप्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी तक्रारदार जितेंद्र गंगाराम राजपूत हे अन्नत्याग उपोषण करणार आहेत.

राजपूत यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे ११ जून २०२२ ला चौदाव्या वित्त आयोग निधीत कथित गैरव्यवहारासंदर्भात तक्रार केलेली होती.

बीडीओंनी सरपंच, ग्रामसेवक यांना लाभ पोहचविण्याच्या हेतूने वस्तुस्थितीप्रमाणे कायदेशीर कार्यवाही न करता केवळ अनियमितता भासविण्याचा प्रयत्न केलेला आहे. सदरचा चौकशी अहवाल वस्तुस्थिती विपर्यस्त असून दोषींवर गुन्हा दाखल करण्यासाठी फेर अहवाल सादर करावा, या मागणीसाठी अन्नत्याग करणार आहेत.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

तर तालुक्यातील जानवे येथील सुभाष भिला पाटील हे जानवे ग्रामंपचायतीत शौचालय आणि घरकुल घोटाळ्यातील दोषींना शासन व्हावे म्हणून गत दोन वर्षांपासून सर्व पुराव्यानिशी संघर्ष करत आहेत. मात्र, अमळनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी त्यांची तक्रार निकाली काढली आहे.

तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांच्या प्रकरणाची चौकशीच केली नसल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे ते प्रजासत्ताक दिनी थेट आत्मदहनच करणार आहेत. यासह पाडळसे प्रकल्पामुळे बाधित सात्री गाव पुनर्वसित गाववासीसुद्धा आंदोलनावर उतरणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress vs BJP Political Clash : 'दिवा विझण्याआधी फडफडतो तशी भाजपची सध्याची अवस्था, शेवट जवळ आलाय'; डीके शिवकुमारांची जहरी टीका

Insurance: अपघात झाला तरी खिशाला फटका नाही! Zero Dep Insurance मुळे कसे वाचतील पैसे?

प्रेमानंद महाराजांना भेटल्यास ढसाढसा रडली पूनम पांडे, नेटकरी म्हणाले...'आधी सगळं करुन बसली आणि आता..'

Latest Marathi News Live Update : राष्ट्रपती मुर्मूंनी घेतलं गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन

Viral Video: ‘संस्कार’ म्हणजे काय ते दाखवलं! वडिलांचा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक

SCROLL FOR NEXT