esakal
जळगाव

Jalgaon News : जिल्ह्यातील कंत्राटदारांचे 27 पासून पुन्हा आंदोलन; थकीत देयकांचा प्रश्‍न

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शासनाकडून कंत्राटदारांच्या विकास कामाच्या बिल आदायगीला दिरंगाई होत आहे. या बिलांबाबत शासनाने केलेल्या निष्काळजी पणाला कंटाळून २७ नोव्हेंबरपासून जिल्हा कंत्राटदार संघटनेने काम बंद आंदोलनाचा इशारा राज्य अध्यक्ष मिलिंद भोसले यांचे मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हाध्यक्ष राहुल शांताराम सोनवणे यांनी दिला आहे. (strike of contractors of district from 27 november jalgaon news )

याबाबत महाराष्ट्र राज्य कंत्राटदार संघटनेतर्फे जळगाव अध्यक्ष राहुल सोनवणे यांनी पत्रकाने याबाबत खुलासा केला आहे. राज्य शासनाकडून निविदा काढल्या जातात. ठेकेदारांकडून कामे करून घेतली जातात. मात्र त्यांची प्रलंबित देणी शासनाकडून दिली जात नसल्याने ठेकेदारांसह कर्मचारी वर्ग अडचणीत आले आहेत.

त्यामुळे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार संघटनेने काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. एकीकडे महाराष्ट्र सरकार मोठमोठ्या विकासाचे पर्व सुरू असल्याचे घोषणा करीत असताना दुसरीकडे छोट्या कंत्राटदार जो राज्याच्या विकासाचा कणा आहे. त्यांना संपविण्याचे पर्व सरकारकडून सुरू आहे.

तीनशे कोटींची देयके थकीत

शासनाकडे कंत्राटदारांनी केलेल्या इमारत दुरुस्ती, रस्ते दुरुस्तीची देयके देण्यासाठी पैसे नसतील तर राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. हे स्पष्टपणे सरकारने घोषित करावे, नाही तर जिल्ह्यातील कंत्राटदारांचे थकीत ३०० कोटींची देयके अदा करावी. ही रक्कम शासनाने अदा न केल्यास येत्या २७ नोव्हेंबर पासून जिल्ह्यातील कंत्राटदार काम बंद आंदोलन पुकारतील, असा इशारा राहुल सोनवणे यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT