Jalgaon Municipal Corporation esakal
जळगाव

NMC Recruitment : जळगाव महापालिकेत 336 पदे भरण्यास मंजुरी; लवकरच भरती

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : महापालिकेचा आकृतिबंध शासनाने मंजूर केला आहे. त्यामुळे ३३६ पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मात्र, महापालिकेने (Municipal) आस्थापना खर्च ३५ टक्के ठेवण्याची अट आहे. (structure of municipal corporation has been approved by government way to fill 336 posts was cleared jalgaon news)

यासाठी शासन कोणताही निधी अथवा अनुदान देणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे. काही तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर महिनाभरात या पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.

शासनाच्या नगरविकास विभागाने गुरुवारी (ता. १६) आकृतिबंधास मंजुरी देऊन त्याबाबतचा अध्यादेश उपसचिव श. त्र्य. जाधव यांच्या स्वाक्षरीने काढला आहे. त्यात म्हटले आहे, की जळगाव महापालिकेच्या १२ ऑगस्ट २०२१ च्या महासभेत ठराव क्रमांक ५५० नुसार सुधारित आकृतिबंधास मंजुरी दिली आहे.

महापालिका आयुक्तांनी दिलेल्या रिक्त पदांची माहितीनुसार एकत्रित पद भरतीस मंजुरी दिली आहे. यात तब्बल ३३६ नवीन पदे निर्माण केली आहेत. याशिवाय ८४२ पदे व्यपगत केली आहेत. व्यपगत पदापैकी २४२ कर्मचारी सध्या कार्यान्वित असल्याने ते निवृत्त झाल्यानंतर ही पदेही व्यपगत करण्यात येतील. या पदासाठी वेतनश्रेणी सहाव्या वेतन आयोगानुसार देण्यात येईल.

४५० पदे भरती होणार

जळगाव महापालिकेच्या आस्थापनेवर सद्यस्थितीत २६३३ पदे मंजूर, तसेच महापालिकेने शिफारस केलेली ८४२ पदे व्यपगत करावयाची पदे वगळून व नवनिर्मितीची ३३६ पदांची वाढ विचारात घेऊन एकूण २१५७ पदांच्या आकृतिबंधास मंजुरी दिली आहे.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

पदासाठी सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्यात येणार आहे. मात्र, यासाठी शासन कोणतेही अनुदान व निधी देणार नाही. तसेच आस्थापना खर्च ३५ टक्के मर्यादित ठेवणे आवश्‍यक असण्याची अट आहे. तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर महिनाभरात या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध होईल.

अशी आहेत पदे कंसात संख्या

कार्यकारी अभियंता (१), कार्यकारी अभियंता (जलनिस्सारण) (१), मुख्य अग्निशमन अधिकारी (१), नगररचनाकार (१), मूल्यनिधारक कर संकलन अधिकारी (१), उपअभियंता पाणीपुरवठा (१), उपअभियंता विद्युत (२), उपअभियंता स्थापत्य (१), उपअभियंता बांधकाम (४), सहाय्यक आयुक्त (३), प्रभाग आयुक्त अधिकारी (४), पर्यावरण संवर्धन अधिकारी (१), शहर क्षयरोग अधिकारी (१),

जीवशास्त्रवेत्ता (१), सहाय्यक अभियंता विद्युत (१), सहाय्यक अभियंता घनकचरा व्यवस्थापन (१), सहाय्यक अभियंता (७), पशुशल्य चिकित्सक (१), उपमुख्य लेखा परीक्षक (१), लेखाधिकारी (१), समाजविकास अधिकारी (१), सहाय्यक मूल्यनिर्धारक कर संकलन अधिकारी (१), सिस्टीम मॅनेजर (१), प्रशासन अधिकारी (शिक्षण मंडळ) (१), कनिष्ट अभियंता (६), कनिष्ठ अभियंता स्थापत्य (१),

कनिष्ठ अभियंता मेकॅनिक (१), कनिष्ठ अभियंता ॲटोमोबाईल (१), कनिष्ठ अभियंता घनकचरा व्यवस्थापन (१), वैद्यकीय अधिकारी एम बबीएस (४), अग्निशमन केंद्र अधिकारी (३), कार्यालय अधीक्षक (४), माहिती जनसंपर्क अधिकारी (१), मिळकत अधीक्षक (१), मुख्य स्वच्छता निरीक्षक (४), संगणक तंत्रज्ञ (१), सुरक्षा अधिकारी (१), अग्निशमन उपाधिकारी (३), मेट्रन (अधीसेविका) (१), अतिक्रमण निरीक्षक (३),

आरेखक ड्राप्समन (१), कर निरीक्षक (६), प्रमुख अग्निशमन विमोचक (२४), वरिष्ठ लिपिक (२०), स्वच्छता निरीक्षक (५), वाहनचालक यंत्रचालक (२८), अग्निशमन विमोचक (फायरमन)(१०), कीटक सहांरक (१), छायाचित्रकार (१), टेलीफोन ऑपरेटर (११), लिपिक (९), ड्रेसर (२), भालदार चोपदार (१), मलेरीया कुली (५), मेलेली जनावरे उचलणारे कामगार (४), शिपाई (२०), सफाई कामगार पुरुष व महिला (२६). याशिवाय आयुक्त, सहाय्यक आयुक्त, प्रशासकीय कार्यालयात पदे आहेत.

"सुधारित आकृतिबंधास मान्यता मिळण्यासाठी शासन स्तरावर सतत पाठपुरावा सुरू होता. या निर्णयामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सहकार्य लाभले. यामुळे शहराच्या विकासाला गती येईल." -सुरेश भोळे, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Slab Proposal: कररचनेत ऐतिहासिक बदल! आता जीएसटीत फक्त दोनच दर, केंद्राचा प्रस्ताव मंजूर

Explainer: 'गाझा'वर ताबा मिळवण्यासाठी इस्रायल तयार; पण २० वर्षांपूर्वी सैनिकांना माघारी बोलावण्याची आली होती वेळ

Vajrasana Benefits: जेवल्यावर लगेच करता येणारे एकमेव आसन! जाणून घ्या वज्रासनाचे जबरदस्त फायदे

Charging Port Repair Tips : मोबाइल चार्ज होत नाही? घरच्या घरी 'या' सोप्या ट्रिकने दुरुस्त करा पोर्ट, बघा एका क्लिकवर

Trump Tariff: ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकेलाच बसला! 446 कंपन्या दिवाळखोर; बेरोजगारीही वाढली

SCROLL FOR NEXT