Student Scholarship  esakal
जळगाव

Student Scholarship : विद्यार्थी शिष्यवृत्ती अद्यापही प्रलंबित; NSUI आयुक्तांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा

चोपडा : मागील शैक्षणिक वर्ष २०२१-२२ ची जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अजूनही प्रलंबित आहे. ती लवकर मिळावी, या आशयाचे निवेदन एनएसयूआय प्रदेशाध्यक्ष अमीर शेख व काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एनएसयूआय प्रदेश सचिव चेतन बाविस्कर, कविता बोरसे, प्रतीक्षा सूर्यवंशी, प्रदीप नेरपगारे यांनी जळगाव समाज कल्याण विभाग सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे, की मागील शैक्षणिक वर्षाचा विचार केला असता ज्या विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्ती आली जरी असली तरी त्या विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नाही. म्हणजेच तो शिक्षणासाठी लागणाऱ्या शुल्क अभावी शिक्षणापासून वंचित राहतो, मग त्या शिष्यवृत्तीचा विद्यार्थ्यांना फायदा होत नाही.

याबाबत तिचा प्रश्न आपण सरकारपर्यंत पोचवावा व मागील वर्षाच्या सर्व स्थगित असलेल्या शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांपर्यंत लवकरात लवकर पोचवावी व विद्यार्थ्यांच्या समाधानी निर्णय घ्यावा; अन्यथा एनएसयूआयच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा एनएसयूआयच्या वतीने देण्यात आला.

या वेळी निवेदनावर सरचिटणीस कविता बोरसे, प्रतीक्षा सूर्यवंशी, प्रदीप नेरपगारे, समन्वयक शुभम पाटील, सागर पाटील, गोपाल क्षीरसागर आदी विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jensen Huang Nvidia : एनव्हिडियाच्या सीईओचे आणखी एक अफेअर समोर; जेन्सेन हुआंग ज्या महिला कर्मचाऱ्यासोबत हॉटेलमध्ये आढळले, ती नेमकी कोण?

'आम्ही एकमेकींशी बोलणंही टाळायचो' वर्षा उसगांवकर अश्विनी भावेंबद्दल बोलताना म्हणाल्या... 'ऋषी कपूर अन् त्यांची मैत्री खटकायची'

Nagpur Politics: नागपुरात शिंदेसेनेचे नवे ‘मॉडेल’, ताकद वाढवण्यासाठी घेतला मोठा निर्णय

21 Six, 7 Fours! न्यूझीलंडच्या बेव्हॉन जेकब्सचे वन डेत विक्रमी द्विशतक! भारतीय गोलंदाजांची केलेली धुलाई आता...

Indian Political History: परराष्ट्र सचिवांना हटविणे ही चूक होती; राजीव गांधींची सोनियांकडे कबुली

SCROLL FOR NEXT