crime news esakal
जळगाव

Jalgaon News : दुचाकी उभी करण्याच्या वादातून विद्यार्थ्यावर धारदार चाकूने वार

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील सेंट जोसेफ शाळेजवळ गाडी लावण्याच्या कारणावरून १६ वर्षीय विद्यार्थ्याला ३ ते ४ गुंडांनी (Goons) धारदार चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना सायंकाळी सहाला घडली.

याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (student was stabbed by goons with sharp knife due to dispute over parking bike jalgaon news)

रामानंदनगर पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीत शहरातील दांडेकर नगरातील रहिवासी आर्यन अजय पाटील (वय-१६) हा काशिनाथ पलोड या शाळेत दहावीच्या वर्गात शिकत आहे. सोमवारी (ता.१३) सायंकाळी सहाला आर्यन हा दुचाकीने खासगी क्लाससाठी मित्र सोहम इखनकर याला घेण्यासाठी सेंट जोसेफ शाळेजवळील ठाकरे कॉम्प्लेक्स येथे आला.

त्याठिकाणी अगोदरच तीन ते चार तरुण उभे होते. दुचाकी पार्क करताना या तरुणांनी इथे दुचाकी लावू नको असे सांगून आर्यनला चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तर एकाने पाठीत चाकूने वार केला व सर्वजण घटनास्थळाहून पसार झाले.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

जखमी अवस्थेत आर्यनच्या मित्रांनी त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. या प्रकरणी आर्यनने दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात रात्री अकराला अज्ञात ३ ते ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Datia Bypoll BJP Crisis : भाजपने माजी गृहमंत्र्यांचे तिकीट कापले, नाराज कार्यकर्त्यांकडून शहरात जाळपोळ, महामार्ग रोखला; पोलिसांवरही दगडफेक

Rameshbhai Kacholia Passes Away : हजारो सामाजिक संस्थांचा आधारवड हरपला, रमेशभाई गुलाबचंद कचोलिया यांचे मुंबईत निधन

Solapur: मोफत वधू-वर सूचक सेवेतून 3 हजारांहून अधिक संसारांना नवी दिशा; इरण्णा पनशेट्टी यांचे समाजसेवेचे प्रेरणादायी कार्य

Fake ₹500 Notes Seized : जळगावात सिनेस्टाईल थरार! बैलगाडीला धडक देऊन पळणाऱ्या कारमधून 500 रुपयांच्या नकली नोटा अन् तलवारी जप्त; 24 बंडले आढळल्याने गूढ वाढले

Akola: बोगस बियाण्यांवरून कृषी अधिकाऱ्यांना कक्षात डांबले; संतापाचा उद्रेक; शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

SCROLL FOR NEXT