Students of Godavari Engineering with a project on bicycle powered water purifier. esakal
जळगाव

Innovation : अहो आश्‍चर्यम..! सायकलवर चालणारे ‘water purifier'

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : येथील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील यंत्र विभागाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी सायकलीवर चालणारे वॉटर प्युरिफायर बनविले आहे. अभिनीत भावसार, दीपक शुक्ला, मिहीर चौधरी आणि वर्षा पाटील यांनी सायकलच्या पेडलचा वापर करून हे वॉटर प्युरिफायर बनविले आहे. (students of godavari engineering made Bicycle powered water purifier Jalgaon innovation latest marathi news).

सामान्यतः वॉटर प्युरिफायर चालविण्यासाठी विजेचा उपयोग केला जातो. मात्र, काही दुर्गम भागांमध्ये, जिथे वीजपुरवठा पोचू शकत नाही, अशा ठिकाणी हे यंत्र खूप उपयोगी पडू शकते. या प्रकल्पाची आखणी आणि बांधणी करताना विद्यार्थ्यांना प्रा. किशोर महाजन (मार्गदर्शक), तसेच विभागप्रमुख प्रा. तुषार कोळी व प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांचे मार्गदर्शन लाभले

असे चालते यंत्र

या यंत्रामध्ये पेडलद्वारे मिळणाऱ्या मानवीय ऊर्जेचा उपयोग करून, त्याचे वीज ऊर्जेत रूपांतर केले जाते व ती ऊर्जा बॅटरीमध्ये साठवली जाते. ती संचित ऊर्जेचा गरजेनुसार वापर करून, त्यावर वॉटर प्युरिफायर चालविले जाते.

या वॉटर प्युरिफायरची क्षमता एक मिनिटाला दोन ते तीन लिटर पाणी फिल्टर करण्याएवढी आहे. बॅटरी एक वेळ संपूर्ण चार्ज केल्यावर त्याद्वारे फिल्टर सतत तीन ते चार तास काम करू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT