School Bus News esakal
जळगाव

Jalgaon : बस अभावी विद्यार्थ्यांची शाळेसाठी पायपीट; बस सुरु करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा

नगरदेवळा (ता. पाचोरा) : परिसरातील शिंदोळ, वडगाव (तिग्जी), दस्तापूर (ता. सोयगाव, जि. औरंगाबाद) नगरदेवळा सीम, निपाणे (ता. पाचोरा) यांना शिक्षणासाठी नगरदेवळा येथे यावे लागते.

ज्यांच्याकडे वाहनाची व्यवस्था असेल ते त्यांच्या वाहनाने काही खासगी वाहनाने येतात. परतु बऱ्याच विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना पाऊस, थंडी, ऊन यांचा सामना करत पायपीट करत शाळा गाठावी लागते. (Students walk to school due to lack of bus Demand to start bus Jalgaon News)

बऱ्याच वेळा अनेक अडचणी येतात. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर व शारीरिक प्रकृतीवर होतो. सकाळ व दुपार सत्राचे सत्तर ते ऐंशी विद्यार्थी ये- जा करत असतात. विद्यार्थ्यांना बसची सुविधा उपलब्ध व्हावी, या दृष्टीने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सह संयोजक जगदीश सोनवणे यांनी पाचोरा आगार व्यवस्थापक यांना २२ सप्टेंबरला बस सुरू करण्याबाबत निवेदन देऊनही अद्यापपर्यंत बस सुरू करण्यात आली नाही.

ही बससेवा त्वरित सुरू करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सहकार्य करावे, अन्यथा आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही. अशा आशयाचे निवेदन नुकतेच पाचोरा आगार व्यवस्थापक, पाचोरा पोलिस ठाणे, शिक्षणाधिकारी जळगाव यांना दिले असल्याचे ‘सकाळ’शी बोलताना जगदीश सोनवणे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT