Crime News esakal
जळगाव

Crime Update : माथेफिरूंनी लावली Parkingमधील वाहनांना आग

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : गुरुवारी पहाटेच्या सुमारास गणेशनगरातील रहिवासी असलेल्या व्यावसायिकांची कार व दुचाकी अशी दोन वाहने अज्ञात माथेफिरूंनी जाळल्याचा प्रकार उघडकीस आला.दोन दिवसांपूर्वीच रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत माथेफिरूंनी दोन वाहने जाळल्याची घटना घडल्यानंतर पुन्हा अशीच घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

गणेशनगरातील संतबाबा हरदासराम हाउसिंग सोसायटीतील गंगा अपार्टमेंटमध्ये संतोष श्‍यामलाल कुकरेजा राहतात. त्यांनी आपली कार (एमएच १९, एएक्स २८१४) गुरुवारी रात्री अपार्टमेंटमधील वाहनतळाच्या ठिकाणी लावली होती.(Stupid young mans set fire to vehicles in parking lot Jalgaon Crime News)

मध्यरात्री दोनच्या सुमारास दोन अज्ञात तरुणांनी त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावला. या वेळी कुकरेजा दरवाजा उघडून बाहेर आले असता, त्यांना त्या तरुणांनी तुमच्या गाडीला दोन जण आग लावून पळून गेल्याचे सांगितले. कुकरेजा धावतच पार्किंगमध्ये गेले. या वेळी त्यांना गाडीला आग लागल्याचे दिसून आले. त्यांनी लागलीच हेल्पलाइन क्रमांक ११२ वर कॉल करून पोलिसांना घटनेची माहिती दिली.

दुचाकीही पेटविली

या अपार्टमेंटमध्ये कारला आग लावल्यानंतर त्या ठिकाणाहून थोड्या अंतरावर असलेल्या सुनीलकुमार रिझूराम मतानी (रा. गोधडीवाला अपार्टमेंट) यांची दुचाकी (एमएच १९, एझेड ७११४) माथेफिरूंनी जाळून त्या ठिकाणाहून पळ काढला. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT