Jalgaon Government Medical College and Hospital Jalgaon Government Medical College and Hospital
जळगाव

Jalgaon GMC : मेंदूज्वर झालेल्या महिलेला मिळाले जीवदान; जीएमसीच्या वैद्यकीय पथकाचे यश

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon GMC : हलाखीच्या परिस्थितीत जगत असलेल्या परिवारातील महिलेला मेंदूज्वर व मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये असलेल्या रक्ताच्या गाठीच्या आजाराचे निदान झाले.

महिलेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (GMC) यशस्वी उपचार झाले आहेत. (success of GMC medical team saved life of women suffering from encephalitis jalgaon news)

वैद्यकीय पथकाने आपले कौशल्य पणाला लावून सदर महिलेचा जीव वाचविण्यात यश मिळविले. अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी वैद्यकीय पथकाचे कौतुक करून महिलेला रुग्णालयातून निरोप दिला.

चामखेडा (ता.धरणगाव) येथील २१ वर्षीय महिला ज्योती भिल हिला सारखा ताप येत होता. तीव्र स्वरूपात डोके दुखून चक्कर येत होते. चिडचिडेपणा, अशक्तपणा देखील जाणवत होता.

त्यामुळे तिला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नातेवाईकांनी दाखल केले. या ठिकाणी औषधवैद्यक शास्त्र विभागाच्या पथकाने तपासणी केली. त्यावेळेला विविध तपासणीअंती मेंदूज्वर असल्याचे निदान झाले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी झाल्याचेही निदान झाले. तातडीने महिलेला अतिदक्षता विभागात ठेऊन औषधोपचार करण्यात आले. तिथून यशस्वीपणे ती बरी झाल्यानंतर तिला जनरल कक्षात दाखल करण्यात आले होते. सुमारे २५ दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर ती बरी झाली.

त्यामुळे तिला अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांच्या उपस्थितीत रुग्णालयातून निरोप देण्यात आला. महिलेवर उपचार करण्याकामी डॉ. विजय गायकवाड, डॉ. दुष्यंत पवार, डॉ. सुनील गाजरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अमित भंगाळे, डॉ. नेहा भंगाळे, डॉ. गजानन परखड, डॉ. विशाल आंबेकर, डॉ. सत्यजित सातपुते, इन्चार्ज परिचारिका यशोदा जोशी आदींनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT