Baseball player Rekha Dhangar and Indian baseball team that has participated in international tournaments.  esakal
जळगाव

Success Story : गरीब कुटुंबातील ‘बेसबॉल’पटूची हॉंगकॉंग भरारी; आमदार चव्हाणांमुळे स्वप्न पूर्ण

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : वाघळी (ता. चाळीसगाव) येथील सर्वसामान्य कुटुंबातील ट्रॅक्टरचालकाची मुलगी रेखा धनगर हिने आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत हाँगकाँग येथे महिला बेसबॉल संघात भारताचे प्रतिनिधित्व करून पहिले दोन सामने जिंकले.

तिच्या या चमकदार कामगिरीमुळे चाळीसगावचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे. (success story Rekha Dhangar represented India in women baseball team in Hong Kong at an international tournament jalgaon news)

आमदार मंगेश चव्हाण यांच्या आर्थिक सहकार्याने माझ्या मुलीचे स्वप्न पूर्ण झाल्याची भावना रेखा हिचे वडील पूना धनगर व्यक्त केली असून, वाघळीकरांनी आमदार चव्हाण यांचे आभार मानले आहेत.

वाघळी येथे ट्रॅक्टरचालक असलेले पूना धनगर यांची मुलगी रेखा हिला हॉंगकॉंग येथे आयोजित आंतरराष्ट्रीय महिला बेसबॉल स्पर्धेत आर्थिक परिस्थितीमुळे सहभागी होणे शक्य होणार नव्हते.

मात्र तालुक्याचे आमदार चव्हाण यांना या संदर्भात माहिती मिळताच रेखा हिचे पालकत्व स्वीकारून तिच्या स्पर्धेचा सर्व खर्च करण्याची जबाबदारी घेतली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

रेखा हिने जालिंधर व हरियाणा येथे जवळपास एक महिना प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर गेल्या गुरुवारी (ता. १८) भारतीय महिला बेसबॉल संघासोबत हॉंगकॉंगला रवाना झाली.

विजयी घोडदौड

रेखा धनगर सहभागी असलेल्या भारतीय महिला बेसबॉल संघाने थायलँडविरुद्ध असणारा पहिला सामना जिंकत विजयी सलामी दिली. त्यानंतर मलेशिया विरुद्धचा सामना देखील १९-० ने जिंकत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे.

भारतीय महिला बेसबॉल संघ व चाळीसगावचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावणाऱ्या रेखा धनगर हिला विजयी वाटचालीसाठी आमदार चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Imran Khan Jail Torture : इम्रान खान यांचा तुरुंगात छळ सुरू ; एक डोळा पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर!

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT