Sunil mahajan esakal
जळगाव

भाजपचा त्या वेळी विरोध का नाही?

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : महापालिकेत भारतीय जनता पक्ष (BJP) सत्तेत होता, त्या अडीच वर्षांत पदाधिकारी, नगरसेवकांनी झोपा काढल्या का? त्याच वेळी या प्रक्रियेला त्यांनी विरोध का केला नाही, असा सवाल महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी पत्रकार परिषदेत केला.
घरपट्टीत वाढ केलेली नाही. मालमत्तेत बदल केला असल्यास त्यावर आकारणी केली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजपने घरपट्टी वाढीव आकारणीविरोधात मोर्चा काढला. त्यावर विरोधी पक्षनेते सुनील महाजन म्हणाले, की शहरातील मालमत्तांच्या फेर आकारणीचा प्रस्ताव आला होता. त्या वेळी आम्ही त्याचा विरोध केला होता. आजही प्रशासनाकडून कर आकारणीत वाढ करण्यात आलेली नाही. मात्र, २००२ पासून महापालिकेकडून फेरमूल्यांकन न केल्याने २०१६ मध्ये फेरमूल्यांकनासंदर्भांत निर्णय घेण्यात आला. त्यानंतर सर्व्हे करून नवीन मालमत्तांचा शोध घेण्यात आला. पूर्वीच्या मालमत्तांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे व वापरात बदल झाल्यामुळे त्यांना वाढीव किंवा बदल झालेल्या वापराची बिले देण्यात येत आहेत. त्यामुळे त्याला घरपट्टीत वाढ म्हणता येणार नाही.

भाजपवरच आरोप करीत सुनील महाजन म्हणाले, की २०१९-२० मध्ये अर्थसंकल्पीय सभेत भाजपच्या तत्कालीन सभापती ॲड. शुचिता हाडा यांनी फेरमूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, फक्त सुनावणी बाकी आहे. ही सुनावणी घेऊन अंमलबजावणी झाल्यास महापालिकेच्या उत्पन्नात २७ कोटींची वाढ होऊ शकते, असे सांगितले होते. मात्र, आता तेच प्रशासन व सत्ताधाऱ्यांवर आरोप करीत आहेत, हे योग्य नाही.

महागाईविरोधीही आंदोलन करावे

सुनील महाजन म्हणाले, की भाजप आंदोलन करीत आहे. मात्र, आज देशात पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे जीवनावश्‍यक वस्तूंच्या किमतीही वाढल्या आहेत. सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे. भाजपने त्याविरोधातही आंदोलन करावे, असे आव्हानही त्यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : सरकारने लोकांची गैरसोय करुन आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला- आशुतोष रांका

RBI Special Window: रिझर्व्ह बँकेची ‘स्पेशल विंडो;तेल कंपन्यांना होणार डॉलरचा अखंडित पुरवठा

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

SCROLL FOR NEXT