Super moon Concept esakal
जळगाव

Jalgaon : मंगळवारच्या पौर्णिमेस ‘सुपरमून’ची अनुभूती

सचिन जाेशी

जळगाव : प्रत्यक्षात चंद्राचा (Moon) आकार बदलत नसला तरी पृथ्वीपासूनच्या (Earth) त्याच्या कमी- अधिक होणाऱ्या अंतरामुळे तो काही वेळा मोठा म्हणजेच ‘सुपर मून’ (Super Moon) दिसतो, त्याचा प्रत्यय मंगळवारी पौर्णिमेच्या दिवशी (ता. १४) येणार आहे. (Super moon will appear today Jalgaon News)

चंद्राची पृथ्वीभोवती फिरण्याची कक्षा थोडी अंडाकृती आहे. त्यामुळे चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील अंतर सतत बदलत असते. चंद्र पृथ्वीच्या कधी जवळ तर कधी दूर असतो. जवळ असलेल्या बिंदुला पेरिजी (Perigee Point) आणि दूर असलेल्या बिंदुला अपोजी (Apogee Point) म्हणतात. चंद्राचे पृथ्वीपासून सरासरी अंतर ३ लाख ८४ हजार ४०० कि.मी. आहे. पृथ्वीभोवती फिरतांना चंद्र पौर्णिमेच्या (Full Moon) दिवशी ज्यावेळी पेरिजी (Perigee Point) बिंदु वर येतो. त्यावेळी पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतर सगळ्यात कमी म्हणजे ३ लाख ५६ हजार ५०० कि.मी. असते. अंतर कमी झाल्यामुळे इतर दिवशी दिसणाऱ्या आकाराच्या तुलनेत चंद्र १४% मोठा आणि ३०% जास्त प्रकाशित दिसतो. आकाराने मोठा दिसणाऱ्या पौर्णिमेच्या या चंद्राला ‘सुपरमून’ म्हणतात. अमेरिकेत यावेळी लहान लाल बेरी पिकतात म्हणून त्याला अमेरिकेत ‘स्ट्रॉबेरी’ चंद्र म्हणण्याची पद्धत आहे.

"मंगळवारी रात्री ढगाळ वातावरण नसेल तर नागरिकांनी ‘सुपरमून’ जरूर पाहावा."
- अमोघ जोशी खगोल अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT