crime  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : तिघे सराईत जिल्ह्यातून हद्दपार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरात टोळीने गुन्हे करणाऱ्या तिन्ही सराईत यांना पोलिस अधीक्षक यांनी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. हद्दपार करण्यात आलेल्या या अट्टल गुन्हेगारांवर विविध पोलिस ठाण्यात आठ ते दहा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. (Superintendent of Police deported criminal for gang crimes jalgaon news)

तडीपार करण्यात आलेल्यांमध्ये स्वप्नील ऊर्फ गोलू धर्मराज ठाकुर (वय १९ रा. डी.एन.सी. कॉलेजजवळ, शंकर अप्पानगर, जळगाव), निशांत प्रताप चौधरी (वय १९, रा. शंकर अप्पानगर) कुणाल ऊर्फ दुंडया किरण कोळी (वय १९, रा साईसिटी, कुसूंबा ता. जळगाव) या तिघांचा समावेश आहे.

या तिघांनी सलग पाच गंभीर गुन्हे एकत्र केले असून इतरही गुन्हे त्यांच्यावर दाखल आहे.

पोलिस ठाण्यातील गुन्ह्यांचा अभ्यास करत निरीक्षक जयपाल हिरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी,सचिन पाटील, योगेश बारी, सुधीर साळवे, साईनाथ मुंडे, निलोफर सय्यद, वरिष्ठ निरीक्षक किशन नजन पाटील, सहाय्यक फौजदार युनूस शेख, सुनील दमोदरे यांनी तिघांच्या हद्दपारीचे प्रस्ताव जिल्‍हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांना सादर केला होता.

गुरुवारी (ता.१९) पोलिस अधीक्षकांनी तिघा सराईत यांना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT