surya namaskar day esakal
जळगाव

Jalgaon News : सूर्यनमस्काराने मानसिक, शारीरिक विकार दूर; सामूहिक सूर्यनमस्कार दिन

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : योग साधना करताना योगासनांच्या पूर्वी शरीराची लवचिकता वाढविण्यासाठी सूर्यनमस्कार करणे आवश्यक असते. सातत्याने सूर्यनमस्कार साधना केल्याने शारीरिक लाभ तर प्राप्त होतातच शिवाय मंत्र उच्चारांसहित सूर्यनमस्कार केल्याने मानसिक स्थिरता प्राप्त करण्यासाठीसुद्धा मदत होते. (Surya Namaskar removes mental and physical disorders group Surya Namaskar Day jalgaon news)

सूर्यनमस्काराचा स्थिरतापूर्वक अभ्यास केल्यास अनेक शारीरिक, मानसिक विकार दूर होऊन सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते व आध्यात्मिक ऊर्जा वाढीस लागते, असे विचार मान्यवरांनी सूर्यनमस्कार दिनानिमित्त व्यक्त केले.

येथील मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अॅण्ड नॅचरोपॅथीद्वारे सामूहिक सूर्यनमस्कार साधना कार्यक्रम शनिवारी (ता. २८) महाविद्यालयाच्या मैदानावर झाला.

ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या सुषमा कंची, क्रीडाशिक्षक डॉ. रणजित पाटील, सेवानिवृत्त प्राध्यापक, योगसाधक डॉ. डी. टी. नेहते, सोहमचे संचालक डॉ. देवानंद सोनार आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

संचालक डॉ. सोनार यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून सूर्यनमस्कार दिनाचे महत्त्व याविषयी माहिती दिली. उपस्थित योग साधक, विद्यार्थ्यांकडून सूर्यनमस्काराचा सामूहिक अभ्यास प्रा. गीतांजली भंगाळे यांनी करून घेतला.

साधना बोंडे यांनी अग्निहोत्र केले. प्राचार्या कंची यांनी सूर्यनमस्कार दिनानिमित्त मार्गदर्शन करीत शरीरशास्त्रीय आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून सूर्यनमस्काराचे आणि सूर्य उपासनेचे महत्त्व पटवून दिले.

शीतल पाटील यांनी सूत्रसंचालन केल. प्रा. सोनल महाजन यांनी आभार मानले. प्राचार्य डॉ. सं. ना. भारंबे, प्रा. गीतांजली भंगाळे, प्रा. ज्योती वाघ, प्रा. पंकज खाजबागे, प्रा. अनंत महाजन, प्रा. सोनल महाजन, साहिल तडवी, पूजा उभाळे, सायली अजनाडकर, विवेक चौधरी यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT