criminal chetan patil esakal
जळगाव

पद्मालयला गावठी कट्ट्यासह संशयित तरुणास अटक

आल्हाद जोशी

एरंडोल (जि. जळगाव) : श्रीक्षेत्र पद्मालय येथील पडक्या बसस्थानकाजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने भातखेडे (ता. एरंडोल) येथील २२ वर्षीय युवकास अटक करून त्याच्याकडून सुमारे ५० हजार रुपये किमतीचे दोन कट्टे जप्त केले. श्रीक्षेत्र पद्मामालाय परिसरात गावठ कट्ट्यासह (Pistols) युवक सापडल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. (Suspect carrying pistols arrested in Padmalaya jalgaon Crime news)

जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अमोल देविदास देवढे यांना पद्मालय येथे एक युवक गावठी कट्ट्यासह फिरत असल्याची गुप्त माहिती मिळाली. उपनिरीक्षक अमोल देवडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचारी भगवान पाटील, सुनील दामोदरे, अशरफ शेख, नंदलाल पाटील, राहुल बैसाणे, ईश्वर पाटील यांना याबाबत माहिती दिली. शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी पद्मालय परिसरात गेले. पद्मालय येथील शासकीय विश्रामगृहाच्या बाजूला असलेल्या अंधारात वाहन लाऊन कर्मचाऱ्यांनी संशयिताचा शोध घेण्यास सुरवात केली. रात्री साडेअकराच्या सुमारास पद्मालय येथील जुन्या बसस्थानकाजवळ अंधारात एक युवक असल्याचे दिसताच गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी त्यास ताब्यात घेतले.

त्याची विचारपूस केली असता त्याने स्वत:चे नाव चेतन गोविंदा पाटील (भदाणे) (रा. भातखेडे, ता. एरंडोल) असल्याचे सांगितले. त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेस सुमारे पन्नास हजार रुपये किमतीचे दोन गावठ कट्टे आढळून आले. पोलिसांनी त्यास तत्काळ ताब्यात घेऊन एरंडोल पोलिस स्थानकात आणले. याबाबत भगवान तुकाराम पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून चेतन पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शरद बागल तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train AI Fake Tickets : मुंबई लोकल ट्रेनसाठी ‘AI’द्वारे बनावट तिकिटे तयार करणाऱ्यांना होवू शकते पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

Crime: डोळे काढले, शरीरावर १५० जखमा अन्...; १४ वर्षीय प्रेयसीसोबत भयंकर कृत्य, ४८ वर्षीय प्रियकराने क्रूरतेच्या मर्यादा ओलांडल्या

IND vs SA: 'ऋतुराजला एका अपयशामुळे टीम इंडियातून काढू नका, मी हात जोडले...', माजी क्रिकेटरची विनंती

Army Jawan : देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या जवानाचा यथोचित सन्मान; सैनिकाच्या 'त्या' कृतीने जिंकली मने, असं काय केलं?

PMC Hoarding Fee : होर्डिंग शुल्क दरवाढीचा ठराव शासनाकडून रद्द; महापालिकेला मोठा झटका!

SCROLL FOR NEXT