Mukund More esakal
जळगाव

Jalgaon Crime News : 2 वर्षांपासून फरारी संशयिताला अटक

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : रेल्वेत नोकरीला लावून देतो, असे आमिष दाखवून तरुणाची फसवणुकीच्या गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरारी असलेला संशयित मुकुंद बापू मोरे (रा. चाळीसगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी (ता. २६) सकाळी दहाला नाशिक येथून अटक केली. त्याला एरंडोल पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. (Suspect on run for 2 years arrested jalgaon Crime News)

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

मुकुंद मोरे जळगाव जिल्ह्यातील बेरोजगार असलेल्या तरुणांना हेरून रेल्वेत नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून पैसे घेत होता. मात्र, नोकरी न लागलेल्या व्यक्तीने पैशांचा तगादा लावल्याने मुकुंद मोरे याने धनादेश दिला.

मात्र, धनादेशही बाऊन्स झाला. याप्रकरणी मुकुंदविरोधात २०२१ मध्ये एरंडोल पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून मुकुंद फरारी झाला होता. दरम्यान, संशयित नाशिक शहरात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली.

त्यावरून पथकाने रविवारी सकाळी दहाला नाशिक बसस्थानक परिसरात सापळा रचून संशयित मुंकुंद बापू मोरे याला अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT