tailor shop on Khed Road was burnt down with ready made goods jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon News : खेडरोडवर टेलरचे दुकान पेटले तयार मालासह साहित्य खाक

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील जुना खेडी रोडवरील जितू टेलर यांच्या दुकानाला अचानक आग लागल्याने सुमार १ लाख ८७ हजारांचे मोठे नुकसान झाले आहे. टेलरिंग दुकानात लागलेल्या आगीचे ठोस कारण अद्याप समोर आले नसून आग कशाने लागली किंवा खोडी काढण्यासाठी कोणी आग लावली असावी, या बाबत पोलिस तपासात माहिती उघड होणार असून शनिपेठ पोलिस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक आगीची नोंद करण्यात आली आहे. (tailor shop on Khed Road was burnt down with ready made goods jalgaon news)

शहरातील जुना खेडी रोडवर प्रल्हाद छगन बाविस्कर (वय ४९) कुटुंबीयांसह वास्तव्याला आहेत. टेलरिंगचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे जुना खेडीरोडवर जितू टेलर नावचे दुकान आहे.

शनिवार(ता.२५) रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांच्या टेलर दुकानाला अचानक आग लागली. या आगीत शिवलेले व न शिवलेले कपडे, मशिनरी साहित्य असा एकूण १ लाख ८७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जळून खाक झाला आहे.

माहिती मिळाल्यावर महानगरपालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाल्याने ही आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र, ही आग कशामुळे लागली याची कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. दुकानदार प्रल्हाद बाविस्कर यांनी दिलेल्या खबरीवरून शनिपेठ पोलिस ठाण्यात आकस्मिक आगीची नोंद करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक योगेश ढिकले तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DMart Stock Price: डीमार्टच्या प्रॉफिटमध्ये 15 टक्के वाढ; तरीही शेअर 3 टक्के घसरला, गुंतवणूक करावी का?

'फुलपाखरू' मालिका अर्ध्यातच का सोडलीस? चेतन वडनेरेने सांगितलं खरं कारण; म्हणाला, 'एक वेळ अशी आली जेव्हा...'

INDW vs PAKW: पाकिस्तानला पराभूत केल्यानंतरही हरमनप्रीत कौर नाराज! म्हणाली, आता मायदेशात गेल्यानंतर...

RSS History: अभ्यासक्रमात आता 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास'; 'या' विद्यापीठाने घेतला महत्त्वाचा निर्णय

Natural Collagen Boosters: सप्लीमेंट्स विसरा! 'या' 5 नैसर्गिक पदार्थांनी वाढवा कोलेजन, त्वचारोगतज्ज्ञांनी शेअर केला खास Video

SCROLL FOR NEXT