Accident News esakal
जळगाव

Jalgaon News : दुचाकीची Lift घेणे बेतले वृद्धेच्या जिवावर

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : एका वृद्धेचा विदगाव ते कानळदा रस्त्यावर गुरुवारी (ता. २२) सकाळी दहानंतर अपघातात मृत्यू झाला.

त्या वृद्धेने एखाद्या दुचाकीस्वाराकडून लिफ्ट मागितली असेल आणि दुचाकीच्या चाकात साडीचा पदर अडकून ती खाली पडून मृत झाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. प्रभावती निंबा धनगर (वय ७३, रा. शिरसाड, ता. यावल) असे मृत वृद्धेचे नाव आहे.(Taking a two wheeler lift cost life of old woman old woman collapsed on road with her saree caught in wheel Jalgaon News)

प्रभावती धनगर गुरुवारी जळगावकडे निघाल्या होत्या. बस, रिक्षा येत नसल्याने त्यांनी नाईलाजास्तव दुचाकीस्वाराकडे लिफ्ट मागितली. कानळदा-जळगाव रोडने शहराकडे येत असताना, वृद्धेच्या साडीचा पदर दुचाकीच्या चाकात अडकून प्रभावतीबाई क्षणार्धात रस्त्यावर फेकल्या गेल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

यात त्यांचा मृत्यू झाला. वृद्धा मृत झाल्याने भितीने दुचाकीस्वाराने आजीला सोडून पळ काढला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीवरून तालुका पोलिसांनी घटनास्थळी पोचून मृत वृद्धेस जिल्‍हा रुग्णालयात दाखल केले.

वृद्धेची ओळख पटविल्यानंतर तालुका पोलिसांनी शिरसाड (ता. यावल) येथे तिच्या कुटुंबीयांना कळविले. कुटूंबीयांनी तत्काळ जिल्‍हा रुग्णालयात धाव घेतली व मृतदेह पाहताच आक्रोश केला. याबाबत तालुका पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून, संशयिताचा शोध सुरू आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM-Kisan Samman Nidhi : 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही किसान सन्मान निधीचा २१ वा हप्ता, नवी अपडेट समोर; तुमचं नाव तर नाही ना? असं करा चेक

Pune Crime:'विनापरवाना पिस्तूलाची स्टंटबाजी दोघा मित्रांना भोवली'; तळेगाव एमआयडीसीतील घटना, एक गंभीर जखमी तर दुसरा पोलीस कोठडीत

Pro Kabaddi 12: पुणेरी पलटनचा तेलुगू टायटन्सवर ३९-३३ ने दमदार विजय! गुणतालिकेत गाठलं अव्वल स्थान

Jejuri Theft News: अख्खं गाव चोराच्या पाठीमागे, अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलेच | Sakal News

Successful Delivery: 'साताऱ्यातील शासकीय रग्णालयात एका वेळी चार बाळांना जन्म'; आईसह तीन मुली, मुलगा सुखरूप, प्रसूतीची तिसरी वेळ

SCROLL FOR NEXT