Officials of Jalgaon District Junior College Teachers' Association giving a statement to Resident Deputy Collector Sopan Kasar.
Officials of Jalgaon District Junior College Teachers' Association giving a statement to Resident Deputy Collector Sopan Kasar. esakal
जळगाव

Jalgaon HSC News : बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर शिक्षकांचा बहिष्कार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon HSC News : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघातर्फे प्रयत्न केले जात आहेत. मात्र त्याची कुठलीही दखल घेतली जात नसल्याने अस्वस्थता असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी फेब्रुवारी, मार्च २०२४ मध्ये होऊ घातलेल्या बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्काराचा इशारा दिला आहे.

जिल्ह्यातील, राज्यातील सर्वच उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक बहिष्कार टाकतील असे निवेदन निवासी जिल्हाधिकारी सोपान कासार यांना देण्यात आले. (Teachers boycott of examination of 12th answer sheet jalgaon news)

समस्या सोडण्यासंदर्भात मागच्या वर्षी पुकारलेल्या बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी बहिष्कारा दरम्यान शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना १५ दिवसात समस्या सोडविण्याचे लेखी आश्वासन देऊनही समस्यां सुटल्या नाहीत.

असा संघटनेचा आरोप आहे. एक नोव्हेंबर २००५ पूर्वी अर्धवेळ, विना तसेच अंशतः अनुदानावरील नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी व सेवानिवृत्तांना या योजनेचा तातडीने लाभ द्यावा.

शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे १०,२०,३० वर्षाची आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना त्वरित लागू करावी.

निवड श्रेणीसाठी २० टक्क्यांची अट रद्द करावी. आदी मागण्यांचा त्यात समावेश आहे.

शासनाने मागण्या न सोडविल्यास उत्तर पत्रिका तपासणीवरील बहिष्कारामुळे बारावीच्या निकालाला उशीर झाल्यास त्याला कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना जबाबदार न राहता याची संपूर्ण जबाबदारी शासनाचीच असेल असा इशारा निवेदनात देण्यात आला.

संघटनेचे अध्यक्ष प्रा. नंदन वळींकार, सचिव प्रा.सुनील सोनार, कार्याध्यक्ष प्रा.शैलेश राणे, उपाध्यक्ष प्रा. गजानन वंजारी, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा.सुनील गरुड,प्रा.स्वप्नील धांडे, महिला प्रतिनिधी प्रा. प्रमिला सोनवणे,प्रा.एकता कवटे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

Pune Porsche Crash : कल्याणीनगर अपघातापूर्वी अन् नंतर नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Mumbai Lok Saha Election : मुंबईत अनेक ठिकाणी संथगतीने मतदान! कळवा-मुंब्र्यात अनेकजण मतदान न करताच परतले

Lok Sabha Election: कल्याण पश्चिम, भिवंडी मतदारसंघात निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ; मतदार यादीतून हजारो नागरिकांची नावं गायब

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT