Temperature rise esakal
जळगाव

Temperature Rise : सलग तिसऱ्या दिवशी जळगाव सर्वांत हॉट! तापमानाचा पारा 46 अंशांवर

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्ह्यात उष्णतेच्या तीव्र लाटेचा अनुभव येत असून, सलग तिसऱ्या दिवशी जळगाव शहर राज्यात सर्वांत ‘हॉट’ ठरले आहे. (Temperature of city is raise to 46 degrees celsius jalgaon news)

शुक्रवारी (ता. १२) ममुराबादच्या शासकीय हवामान केंद्रात जळगावच्या कमाल तापमानाचा पारा ४४.९ अंश नोंदला गेला, तर वेलनेस वेदर या खासगी संस्थेने जळगावचे कमाल तापमान तब्बल ४५.८ दर्शविले आहे. १५ मेपर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.

जळगाव जिल्ह्यात आठवड्यापासून तापमानाचा पारा सातत्याने वाढत आहे. गेल्या चार दिवसांत तर कमाल तापमानाची विक्रमी नोंद झाली. केवळ आठवड्याभरात कमाल तापमानातील फरक ७ ते ८ अंशांवर पोचला असून, त्यामुळे नागरिक या उष्म्यात अक्षरश: होरपळून निघत आहेत.

रस्त्यावर भट्टीचा अनभव

दोन दिवसांपासून जळगावसह जिल्ह्यातील शहरांचे तापमान ४३ ते ४४ अंशांवर नोंदले जात आहे. शुक्रवारी जळगावात कमाल तापमान ४४.९ अंश नोंदले गेले, तर वेलनेस वेदर या खासगी एजन्सीच्या दाव्यानुसार जळगावचे कमाल तापमान ४५.८ अंश होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या वाढत्या तापमानामुळे रस्त्यावरून जाताना अक्षरश: भट्टीतून जात असल्याचा अनुभव येत आहे. त्यामुळे दुपारी बारा ते सायंकाळी पाच या वेळेत रस्ते निर्मनुष्य असल्याचे चित्र अनुभवास येतेय. भुसावळ, वरणगाव, चोपडा या शहरांमध्येही कमाल तापमानाचा पारा ४५ अंशांवर पोचला आहे.

वेलनेस वेदरने घेतलेली नोंद

जळगाव : ४५.८

भुसावळ : ४५.८

अमळनेर : ४५.४

बोदवड : ४४.९

भडगाव : ४५.२

चोपडा : ४५.८

चाळीसगाव : ४४.६

धरणगाव : ४५.७

एरंडोल : ४५.६

फैजपूर : ४५. १

जामनेर : ४५.५

मुक्ताईनगर : ४५.२

पारोळा : ४४.८

पाचोरा ४५.४

रावेर : ४५.२

वरणगाव : ४५.८

यावल : ४५.४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT