jalgaon sakal
जळगाव

आरोपींना अटकेच्या मागणीसाठी पोलिस ठाण्यात मृतदेहासह ठिय्या

मोहिनी जाधव यांच्या मृत्यूनंतर साक्रीत दुसऱ्या दिवशीही तणाव

सकाळ वृत्तसेवा

साक्री : नगरपंचायत निवडणुकीच्या(sakri nagar panchayat election) निकालानंतर झालेल्या हाणामारीच्या घटनेतील संशयितांना अटक झाल्याशिवाय मृतदेह न स्वीकारण्याची भूमिका घेत नातेवाईकांनी गुरूवारी (ता. २०) मोहिनी जाधव यांचा मृतदेह थेट पोलिस ठाण्यात आणला. यावेळी चर्चेअंती पोलिसांनी लेखी अश्‍वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह (deadbody)स्वीकारला. या प्रकरणाचा तपास आता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे (crime investigation branch)सोपविला आहे.

बुधवारी (ता. १९) सायंकाळी निकालानंतर भाजप पदाधिकारी आणि प्रभाग ११ मधील पराभूत उमेदवार ताराबाई जगताप यांचा मुलगा गोटू ऊर्फ रवींद्र जगताप यांच्यात हाणामारीची घटना घडली होती. या दरम्यान मोहिनी जाधव यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी रात्री उशिरा मोहिनी यांच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीवरून आठ ते नऊ संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर गुरूवारी धुळे येथे इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान, मोहिनी जाधव यांचा मृतदेह सायंकाळी साक्री येथे आणला असता नातेवाईकांनी तो स्विकारण्यास नकार देत थेट पोलिस ठाण्याच्या आवारात आणला.

संशयितांना तत्काळ अटक करावी, त्यानंतरच मृतदेह स्वीकारू अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली होती. त्यामुळे दोन ते तीन तास मृतदेह पोलिस ठाण्याच्या आवारात होता. यावेळी पदाधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांत झालेल्या चर्चेअंती सात दिवसांत संबंधितांवर कारवाई करण्याचे लेखी अश्‍वासन पोलिसांनी दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. या सर्व प्रकरणामुळे गुरूवारीही शहरात मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण असून, सर्वत्र पोलीस बंदोबस्त आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित, सहसंपर्कप्रमुख महेश मिस्तरी, धुळे महानगरप्रमुख मनोज मोरे, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्‍वर नागरे, अरविंद भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस सुरेश सोनवणे, शिवसेना तालुकाप्रमुख पंकज मराठे, नगरसेवक सुमित नागरे यांच्यासह भटके-विमुक्त समाजाच्या विविध संघटनांचे पदाधिकारी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक शिवाजी बुधवंत, धुळे येथील पोलिस निरीक्षक हेमंत पाटील व पोलिस अधिकारी उपस्थित होते.

शिवसेना पदाधिकारी(shivsena workers) व पोलीस अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेवेळी धुळे येथील भाजपच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्यासह आणखी संशयितांचीही नावे यात घेतली जावीत, अशी मागणी करण्यात येत होती.(jalgaon crime news) मात्र, या प्रकरणात जखमी असलेले गोटू उर्फ रवींद्र जगताप यांच्या जबाबानंतरच अन्य संशयितांची नावे यात येतील व सर्वांवर कारवाई केली जाईल, असे अश्‍वासन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. बच्छाव(Upper Superintendent of Police Dr. buchhav) यांनी या वेळी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT