जळगाव : प्राथमिक शाळांमध्‍ये ऐकू येणार किलबिलाट sakal
जळगाव

जळगाव : प्राथमिक शाळांमध्‍ये ऐकू येणार किलबिलाट

दोन वर्षांनंतर जिल्‍ह्यातील अडीच हजारांहून शाळा आजपासून सुरू

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात पहिली ते चौथीच्‍या एकूण २ हजार ५६३ शाळा उद्यापासून (ता. १) सुरू होत आहेत. यामुळे प्राथमिक शाळांमध्‍ये गेल्‍या दोन वर्षांपासून बंद असलेला किलबिलाट पुन्‍हा तब्बल एकदा ऐकण्यास मिळणार आहे.

कोरोना नियंत्रणात आल्यानंतर ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी तर शहरी भागात आठवी ते बारावीच्या शाळा सुरू केल्‍या. यानंतर आता ग्रामीण भागातील पहिली ते चौथी तर शहरी भागातील पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्यास मान्‍यता दिली आहे. राज्य सरकारने याबाबत निर्णय घेत १ डिसेंबरपासून पहिली ते चौथीचे वर्ग सुरू होणार आहेत. परंतु, मुलांना पाठविण्यासंदर्भात पालकांचे संमतिपत्र बंधनकारक आहे.

शाळांमध्‍ये सॅनिटायझेशन

ग्रामीण भागातील पहिली ते चौथी तर शहरी भागातील पहिली ते सातवीचे वर्ग बुधवारपासून सुरू होणार आहे़. या अनुषंगाने बहुतांश शाळांनी वर्ग खोल्‍यांचे सॅनिटायझेशन पूर्ण केले आहे. तर काही शाळांमध्ये साफसफाई, स्वच्छता, निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया सुरू होती. दोन वर्षानंतर प्राथमिकच्‍या शाळा सुरू होत असल्‍याने विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सज्ज झाल्‍या आहेत. वर्गांमध्‍ये चिमुकल्‍यांचा उडणारा गोंधळदेखील आता सुरू होणार आहे.

दिवसाआड वर्ग

कोरोनाच्‍या नवीन प्रकाराच्या अनुषंगाने सावधानता म्‍हणून काही नियमावली आखून दिली आहे. त्‍या दृष्‍टीने शाळांनी नियोजन केले आहे. तर काही शाळांनी विद्यार्थ्यांना एक दिवसाआड बोलविण्याचे नियोजन केले आहे. अर्थात हजेरीपटानुसार पहिल्‍या वीस क्रमांकाचे विद्यार्थींसाठी सोमवार, बुधवार, शुक्रवार तर उर्वरित विद्यार्थ्यांसाठी मंगळवार, गुरूवार व शनिवार असे दिवस ठरवून दिले आहे.

तीन लाख एक हजार ६६५ विद्यार्थी

जळगाव जिल्ह्यात इयत्ता पहिली ते चौथीच्या २ हजार ५६३ शाळा असून यात ३ लाख १ हजार ६६५ विद्यार्थी प्रवेशीत आहेत. त्यामध्ये इयत्ता पहिलीचे ६८ हजार ९७१ तर दुसरीचे ७५ हजार ८६९ तसेच तिसरीचे ७९ हजार १३७ व चौथीच्या वर्गात ७७ हजार ६८८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT