Crime Branch team with the arrested suspect. esakal
जळगाव

Jalgaon : दहा हजारांच्या वसुलीवरुन मित्रानेच सौरभचा गळा चिरला!

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : भादली-कानसवाडा (ता. जळगाव) रस्त्यावरील पाटचारीवर सौरभ यशवंत चौधरी या तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह सोमवारी (ता. ३) सकाळी आढळला होता. दहा हजारांच्या वसुलीवरून दोघा मित्रांमध्ये नशेत वाद होऊन लोखंडी रॉड आणि विळ्याने गळा चिरल्याची कबुली अटकेतील ईश्वर नथ्थू सपकाळे (वय ३०, रा. कानळदा) याने गुन्हे शाखेचे निरीक्षक किशनराव नजन पाटील यांना दिली.

भादली-कानसवाडा रस्त्यावरील पाटचारीवर तरुणाचा खून केलेल्या अवस्थेत मृतदेह सोमवारी आढळला होता. मृताच्या मोबाईलवरून तो सौरभ यशवंत चौधरी (३२, रा. काऊ कोल्हे शाळेजवळ, दशरथनगर) असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी गुन्हे शाखेकडे तपास सोपविल्यानंतर निरीक्षक नजन पाटील यांनी गुन्ह्याशी निगडित सर्व बाजू तपासून पाहिल्या. घटस्फोट, कर्जबाजारीपणा, अनैतिक संबंध अशा विविध प्रकारे चौकशी सुरू असतानाच घटनेच्या रात्री सौरभ त्याचा मित्र ईश्वरसोबत गेल्याची गुप्त माहिती प्राप्त झाल्याने त्या दिशेने तपासाला गती दिली.(The friend cut throat for ten thousand Jalgaon Crime news)

Saurabh Patil

दहा हजारांसाठी खून
कानळदा येथील ईश्वर सपकाळे (वय ३०) त्याच्या मामाकडे वास्तव्यास आहे. रात्री शेळगाव शिवारात मामाच्या शेतावर तो राखणदारीसाठी जात होता. साधारण दोन वर्षांपूर्वी त्याची ओळख परिसरातील सौरभ चौधरी याच्याशी झाली होती. सौरभला दारूचे व्यसन असल्याने त्याने अनेकांकडून पैशांची उचल केलेली होती. त्याला कोणी पैसे देत नसल्याने त्याने ईश्वरकडे व्याजाने पैशांची मागणी केली. ईश्वरने ओळखीचा सुधीर सपकाळे याच्याकडून दहा हजार रुपये स्वतःच्या जबाबदारीवर घेऊन त्याला दिले होते. वेळेत पैसे परत मिळत नसल्याने सुधीरने ईश्वरकडे तगादा लावला होता. त्याच पैशांसाठी ईश्वर सौरभला मागत असल्यावरून वाद होऊन सौरभने ‘तुला पिस्तुलाने गोळ्या झाडीन’ अशी धमकी दिल्याने ईश्वरने संतापात सौरभची हत्या केल्याची कबुली निरीक्षक नजन पाटील यांच्याकडे दिली आहे.

त्या रात्री काय घडले?
सौरभने सकाळीच त्याच्या दाजींकडून एक हजार रुपये घेत दिवसभर दारू ढोसली. रात्री ईश्वर त्याला श्रीराम चौकात भेटल्यावर त्याने पैशांची मागणी केल्यावर सौरभने ‘काय पैसे-पैसे करतो? चल, तुला दारू पाजतो,’ असे सांगत त्याच्या दाजींकडून आणखी पाचशे रुपये मागत दोघेही मोटारसायकलीने शेताच्या दिशेने निघाले. असोदा येथील एका टपरीवर दारू मिळते का, याची चौकशी केली. गांधी जयंती असल्याने दारू मिळू शकली नाही म्हणून त्यांनी एक स्प्राइट व एक पाण्याची बाटली घेत शेत गाठले. तेथे पाटचारीवर बसून सौरभने चिलम भरून गांजा ओढला. दोघेही नशेत असताना पैशांचा विषय निघाला. परत सौरभने ईश्वरला मारण्याचे सांगितल्याने संतापात उठून ईश्वरने राखणदारीचा लोखंडी रॉड त्याच्या कपाळावर मारला. नंतर धारदार विळ्याने त्याचा गळा चिरून त्याच दुचाकीने परत आला. येताना असोदा येथील टपरीवर थांबून शस्त्र फेकत घरी निघून गेल्याचे तो सांगतो.

Suspect Ishwar Sapkale

यांनी केला खुनाचा उलगडा

संशयिताला अटकेची भीती वाटल्याने तो जळगाव येथून कानळदा, चोपडा तेथून धरणगाव मग पाचोरा येथे लपला असताना सापळा रचून त्यास निरीक्षक किशनराव नजन पाटील यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक जालिंदर पळे, उपनिरीक्षक अमोल देवळे, सहाय्यक

फौजदार रवी नरवाडे, संजय हिवरकर, राजेश मेढे, जितेंद्र पाटील, लक्ष्मण पाटील, महेश महाजन, अक्रम शेख, संदीप साळवे, रणजित जाधव, विनोद पाटील, किशोर राठोड, नितीन बाविस्कर, प्रीतम पाटील, ईश्वर पाटील, रमेश जाधव यांच्या पथकाने अटक करून या खुनाचा उलगडा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलचे द्विशतक! इंग्लंडमध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय कर्णधार, मोडले अनेक विक्रम

Navi Mumbai News: नवी मुंबईत ७० हजार वाहनांचा चक्का जाम, नागरिकांसह आयात निर्यातदारांना मोठा फटका

Latest Maharashtra News Updates : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुक्ताई पालखीचे दर्शन घेत स्वागत केले

Thane Crime: ठाणे हादरलं! भाजप आमदारांच्या घरासमोरच गोळीबार; १ जण गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT