Crime News esakal
जळगाव

अल्पवयीन मुलीस फूस लाऊन पळविले

आल्हाद जोशी

एरंडोल (जि. जळगाव) : हळदीच्या कार्यक्रमासाठी आई, वडिल व भावासह गेलेल्या तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीस विखरण शिवारातील शेतातून फूस लावून पळवून नेल्याची घटना गुरुवारी (ता. २१) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याबाबत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत माहिती अशी, की शहरातील शेतांमध्ये अनेक मेंढपाळ कुटुंब रहिवासासाठी आले आहेत. असेच एक मेंढपाळ कुटुंब शेतात राहून आपल्या परिवाराचा चरितार्थ चालवता. विखरण (ता. एरंडोल) येथील तुकाराम भिला यांच्या शेतात मेंढपाळाच्या शालकाच्या मुलीचे लग्न असल्यामुळे सर्व परिवार हळदीच्या कार्यक्रमासाठी विखरण येथे आले होते.

मध्यरात्री उशिरापर्यंत हळदीचा कार्यक्रम चालल्यानंतर परिवारातील सर्व सदस्य शेतातच झोपले होते. पहाटेच्या सुमारास अल्पवयीन मुलीच्या वडिलांना जाग आली असता त्यांची तेरा वर्षीय मुलगी आढळून आली नाही. आई, वडील, भाऊ व नातेवाइकांनी तिचा परिसरात शोध घेतला असता ती आढळून आली नाही. अज्ञात व्यक्तीने तिला फूस लाऊन पळवून नेल्याचा संशय वडिलांना आहे. अल्पवयीन मुलगी रंगाने गोरी असून, शरीराने सडपातळ, केस लांब, उंची पाच फूट असून तिने तपकिरी रंगाची जीन्स व तपकिरी रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला आहे. याबाबत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP नेत्यांचा मोठा विजय! आंदोलनाला वेग; अखेर अभिजीत दिपके यांच्यासह तिघांची सुटका, आता सर्वोच्च न्यायालयात काय घडणार?

Navratri 2026 Wishes in Marathi: 'उदे ग अंबे उदे'... नवरात्रीनिमित्त व्हॉट्सॲपवर शेअर करा देवी दुर्गेच्या आशीर्वादाचे हे सुंदर शुभेच्छा संदेश

Maharashtra Live News :सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मतदानाला सुरुवात...

IND vs WI 3rd T20: इंदूरमध्येही आज बॅट विरुद्ध बॅट? दुसऱ्या सामन्यात ५०१ धावांचा पाऊस, आता तिसऱ्या टी-२०मध्येही फलंदाजांचे वर्चस्व राहणार?

Madhya Pradesh: अकराशे विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप; टीबी रुग्णांना ८ किलोची पोषण आहाराची टोपली

SCROLL FOR NEXT