The sarpanch and upsarpanch of vichkhede ineligible esakal
जळगाव

विचखेडे सरपंच, उपसरपंच अपात्र; शासकीय जमिनीवरील अतिक्रमण भोवले

सरपंच उपसरपंच व सदस्य पदावरून अपात्र करण्यात आल्याचा निर्णय नुकताच जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : विचखेडे (ता. पारोळा) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच मनीषा रवींद्र पानपाटील व उपसरपंच गणपत जावला गायकवाड यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्यामुळे त्यांना सरपंच उपसरपंच व सदस्य पदावरून अपात्र करण्यात आल्याचा निर्णय नुकताच जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिला आहे.

याप्रकरणी पंडित गोबरू पवार व इतर दोन सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यावर चौकशी होऊन सरपंच, उपसरपंच यांनी बेकायदा अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्यामुळे जिल्हाधिकारी राऊत यांनी सरपंच, उपसरपंच व सदस्य पदावरून अपात्र घोषित केले आहे. सरपंच पानपाटील, उपसरपंच गायकवाड यांनी शासकीय जमिनीवर विना परवानगी अनधिकृतपणे अतिक्रमण करून त्यावर सिमेंट काँक्रिटचे व पत्री शेडचे बांधकाम केलेले आहे. अतिक्रमित जागेचा लाभ घेत असल्यामुळे त्यांना सरपंच उपसरपंच व सदस्य पदावरून अपात्र ठरविण्यात यावे. म्हणून पंडित गुबरु पवार, आसाराम सुभान गायकवाड, ओंकार वरेण्या भिल यांनी ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ जे-३ प्रमाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे विवाद अर्ज क्र-५/०२२ ने तक्रार दाखल केली होती.

त्यावर सखोल चौकशी होऊन सरपंच उपसरपंच यांनी शासकीय जमिनीवर शासनाची कायदेशीर परवानगी न घेता बेकायदेशीर व अनधिकृतपणे भोगवटा सदरी नावे लावून घेतले आहे. सदर जागा मिळकती ताब्यात ठेवून लाभ घेत आहेत व पदाचा दुरुपयोग केला असल्याचे सिद्ध झाले. तक्रारदारातर्फे अँड. विश्वासराव भोसले (पिपरखेडकर) यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar : पाच महिन्याच्या गर्भवतीनं जीवन संपवलं; शेवटच्या पत्रात धक्कादायक खुलासा, नेमकं काय लिहिलं?

सैराटमध्ये परश्यासोबत पहिल्यांदा दिलेल्या इंटिमेंट सीन बद्दल बोलली रिंकू राजगुरू, म्हणाली...'मी घाबरुन...'

Latest Marathi News Live Update : शेळ्या-बोकडांवर पाळत ठेवत चोरी करणाऱ्या बोकड चोरट्यांच्या टोळीला पोलिसांनी केली अटक

Rule Change: एलपीजी, पॅन-आधार अन्...; १ जानेवारी २०२६ पासून 'हे' नियम बदलणार, सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार?

Chhatrapati Sambhajinagar News : दिल्लीतील पथसंचलनासाठी अक्षता मुळे हिची निवड; पाच वर्षांनंतर मिळाला मान

SCROLL FOR NEXT