Death  esakal
जळगाव

तरूणाला डुलकी पडली महागात; रेल्वेखाली येऊन ठार

याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

बातमीदार - जिवन चव्हाण

चाळीसगाव (जि. जळगाव) : मित्रांसोबत मुंबईला कामासाठी जाणाऱ्या तरूणाला डुलकी लागल्याने दरवाजातून पडून रेल्वेच्या चाकाखाली आल्याने दुदैवी मृत्यू झाल्याची थरारक घटना चाळीसगाव रेल्वे स्थानकावर रविवारी (ता. १२) रोजी मध्यरात्री घडली आहे. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त, रमेश रमग्य पासवान (वय, २१ रा. गोरखपूर, उत्तर प्रदेश) हा आपल्या मित्रांसोबत गोरखपूर-मुंबई रेल्वेने (क्र. २०१०४) मुंबई येथे कामासाठी जात होता. रेल्वेने प्रवास करत असताना पासवान हा रेल्वेच्या दरवाजात बसलेला होता. तेव्हा त्याला अचानक झोपेची डुलकी आली आणि तो रेल्वेच्या चाकाखाली आला. त्यात तो जागीच ठार झाला. सदर धक्कादायक घटना चाळीसगाव रेल्वे स्थानकावर रविवारी मध्यरात्री १२ : ३५ वाजताच्या सुमारास घडली. येथून जवळ असलेल्या खडकी खांब नंबर- ३२१/२४-२२ दरम्यान ही घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून सदर घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांसह शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करत पंचनामा केला. दरम्यान वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास किशोर सोनवणे करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT