thief looted Items worth 72000 including ornaments in bulglari jalgaon crime news esakal
जळगाव

Jalgaon Crime News : मजुराच्या घरी घरफोडी; दागिन्यांसह 72 हजारांचा मुद्देमाल लंपास

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : पत्र्याच्या शेडचा पत्रा काढून रात्री अज्ञात चोरट्याने मजुराच्या घरातून सोने, चांदीच्या दागिन्यांसह ६२ हजार ४०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना देवळी शिवारात नवकार स्टोन क्रशरवर घडली. (thief looted Items worth 72000 including ornaments in bulglari jalgaon crime news)

संजय जयसिंग यादव हा देवळी परिसरातील नवकार स्टोन क्रशरवर मजुरीचे काम करतो. तो शुक्रवारी (ता.७) आपल्या पत्र्याच्या शेड वजा झोपडीला पत्रा आडवा लावून झोपला होता. सकाळी सातला तो उठला असता घरातील तीन पत्र्याच्या पेट्या व मोबाईल आढळून आल्या नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्याने आजूबाजूला शोध घेतला असता देवळी गावाच्या फाट्याजवळ पेट्या व त्यातील कपडे अस्ताव्यस्त पडलेले दिसले. १६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र ,कानातले व दागिने,"चांदीचे दागिने तसेच मोबाईल आणि ५० हजार रुपये रोख असा एकूण ६२ हजार ४०० रुपयांचा माल चोरून नेल्याचे उघडकीस आले.

संजय यादव याने फिर्याद दिल्यावरून अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी सुनील पाटील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: विराट कोहली अन् शुभमन गिल यांच्यात 'कड्याकाचं' भांडण? स्टार फलंदाज कर्णधाराला बोट दाखवत बडबडला Video Viral

मुंबईत विसर्जन मिरवणुकीत भरधाव कार घुसली, गणपतीच्या ट्रॉलीला धडक देत 4 जणांना उडवलं; घटनास्थळाचा VIDEO

सौंदर्य अन् बुद्धिमत्तेचा संगम! वयाच्या २३व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक करून बनली IFS अधिकारी, कोण आहे तमाली साहा?

Asian Games 2026 : अडखळला, पडला... पण जिद्दीने शर्यत पूर्ण करून भारताचा ४४ वर्षांचा दुष्काळ संपवला! कोण आहे सावन बरवाल?

Satara DJ Dolby Action : पोलिसांची कारवाई चुकीचीच! साताऱ्यात डीजे जप्त झाल्यानंतर उदयनराजेंनी थेट घेतली डॉल्बी चालकांची बाजू; पालकमंत्री देसाईंची भूमिका काय?

SCROLL FOR NEXT