crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : दिवाळीच्या सुटीत चटाई कंपनीसह इलेक्ट्रिक दुकान फोडले

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : औद्योगिक वसाहतील भाग्यश्री ॲन्ड संकेत चटई कंपनीसह परिसरातील महालक्ष्मी इलेक्ट्रिक दुकानातून ७७ हजार ५०० रुपयांचे साहित्य चोरट्यांनी लंपास केले. दिवाळीच्या सुटीमुळे दुकान सात दिवसांपासून बंद होते.

रेकी करुन चोरट्यांनी दुकान फोडले. एमआयडीसी पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.(Thieves broke electrical shop along with mat company jalgaon crime news)

जळगाव एमआयडीसीतील भाग्यश्री अॅन्ड‍ड संकेत चटई कंपनी आणि बाजूलाच हेमंत बऱ्हाटे यांचे महालक्ष्मी इलेक्ट्रिक दुकान दिवाळीमुळे बंद आहे.

त्या संधीचा फायदा घेत शुक्रवारी (ता. १७) रात्री दहा ते शनिवार (ता. १८) सकाळी सातच्या दरम्यान चोरट्यांनी इलेक्ट्रिक मोटारी, वेल्डिंग वायर केबल, ग्राइंडर मशिन, गॅस शेगडी, कुलरच्या मोटारी, वेल्डिंग ट्रान्स्फॉमर्र, कॉपरची तार व इतर सामान असा एकूण ७७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लांबविला.

चटाई कंपनीचे संचालक परविन भारती यांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पोलिस नाईक सचिन मुंडे तपास करीत आहे.

दिवाळीमुळे एमआयडीसी परिसरातील बहुतांश कारखाने बंद होते. काही दुकाने आठवड्यापासून बंद असून, एमआयडीसी परिसरात सामसूम असल्याने चोरट्यांनी संधी साधली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'चाकरमानी’ नव्हे; ‘कोकणवासीय’ म्हणायचे! अजित पवारांची जागवला स्वाभिमान; शासन लवकरच परिपत्रक काढणार

Manoj Jarange Patil: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ उपसमितीचं पुनर्गठन; राधाकृष्ण विखेंकडे अध्यक्षपद

Georai News : पाझर तलावात उतरल्याने बुडून शेतमजूराचा मृत्यू; दिवसभर शोध घेऊनही मृतदेह मिळाला नाही

Mumbai Local Megablock: रविवारी रेल्वे प्रवाशांना फटका बसणार, मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर ब्लॉक; वेळापत्रकात बदल

Beed Lawyer News: सरकारी वकिलाने जीव दिल्याच्या प्रकरणात न्यायाधीशावर गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT