crime news sakal
जळगाव

Jalgaon Crime News : भुसावळला घरफोडी सत्र; 68 हजारांचा ऐवज लंपास

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील शांतिनगर भागातील रहिवासी माधुरी हरिश्चंद्र बढे यांच्या राहत्या घरातील बेडरूमच्या खिडकीतून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ६८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना बुधवारी (ता. १७) उघडकीस आली. (thieves looted money worth around Rs 68 thousand in robbery jalgaon crime news)

ही चोरी मंगळवारी (ता.१६) रात्री बारा ते बुधवारी (ता.१७) सकाळी पाचच्या दरम्यान झाली. बढे यांच्या घरातील बेडरूमच्या खिडकीतून अज्ञात इसमांनी हत्याराने खिडकी तोडून घरात प्रवेश केला व घरातील गोदरेजच्या कपाटात ठेवलेले तीस हजार रोख व अकरा हजार रुपये किमतीचे

२७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, २२ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या चार बांगड्या, चार हजार ४०० रुपये किमतीची १ ग्रॅम सोन्याची मोती असलेली नाकातील नथ असा एकूण ६८ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला.

याबाबत माधुरी हरिश्चंद्र बढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक नीलेश गायकवाड तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार? विखे पाटलांनी दिली मोठी माहिती

Car Accident : समृद्धी महामार्गावर भरधाव कारची अज्ञात वाहनाला धडक; एक ठार, दोघे गंभीर

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Ketu Transit Lucky Zodiac Signs: ‘या’ ६ राशींच्या नशिबात येणार मोठा ट्विस्ट; केतूच्या गोचराने मिळणार धनलाभाची संधी, पाहा तुमची रास आहे का?

Marathi News Live Updates: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT