Police of the crime investigation team inspecting the hotel.
Police of the crime investigation team inspecting the hotel.  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : हॉटेल मितवामध्ये चोरी; दारूचे पेग रिचवित‌ मारला डल्ला

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : ममुराबाद रोडवरील हॉटेल मितवाचे शटर वाकवून चोरट्यांनी डल्ला मारला. गल्ल्यातील १७ हजारंची रोकडसह सीपीयू चोरून नेल्याचे सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाले आहे. ही घटना रविवार (ता. २६) मध्यरात्री घडली. (Thieves robbed Hotel Mitwa jalgaon crime news)

शनिपेठेतील रहिवासी चेतन अनिल वाणी यांची ममुराबाद रोडवरील प्रजापतनगरमध्ये हॉटेल मितवा आहे. रविवारी दहाला नेहमीप्रमाणे हॉटेल बंद झाल्यावर मालक वाणीसह स्टाफ घरी गेला. सोमवारी (ता. २७) सकाळी नऊच्या सुमारास हॉटेल उघडण्यासाठी चेतन वाणी आले असता, त्यांना हॉटेलचे शटर एका बाजूने थोडे उचकवलेल्या अवस्थेत दिसून आले.

त्यांनी शटरचे कुलूप उघडून आत प्रवेश केल्यानंतर त्यांना चिल्लर व चाव्या काऊंटरवर पडलेल्या दिसल्या. त्यांनी गल्ल्याची तपासणी केली असता, १७ हजारांची रोकड व सीपीयू गायब असल्याचे दिसून आले.

हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

डीव्हीआर समजून सीपीयू लंपास

मिळालेल्या माहितीवरून तालुका पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. श्वानपथक व ठसे तज्ज्ञांनी चोरट्यांच्या हाताचे ठसे संकलित केले आहेत. चोरट्याला हॉटेलमध्ये सीसीटीव्हीत आपण चित्रीत झाल्याचे कळताच त्याने काऊंटरवरील बिलिंग संगणकाचा सीपीयू पळविला. मात्र, त्याचे चित्रण डीव्हीआरमध्ये संरक्षित राहिले.

चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

चोरटा मध्यरात्री हातात बॅटरी घेऊन हॉटेलमध्ये शिरला. त्यानंतर त्याने हॉटेलच्या काऊंटरवरील उघड्या दारूच्या बाटलीतून पेग रिचविला. नंतर त्याने काऊंटरचे ड्रॉवर तोडून रोकड घेतली. तो सुमारे १५ ते २० मिनिटे हॉटेलच्या आवारात फिरत होता. त्यानंतर चोरटा दुचाकीने ममुराबादकडे गेल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. पोलिसांनी पूर्ण फुटेज ताब्यात घेतले असून, त्यावरून संशयिताचा शोध सुरू केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT