esakal
esakal
जळगाव

Jalgaon Crime News : चोरट्यांच्या हिंमतीने आता हद्दच गाठली...! चक्क DYSPच्या दारापुढे चोरी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरातील मानराज पार्कजवळील द्रौपदीनगरात परिविक्षाधीन डीवायएसपी यांच्या घराबाहेरुन पोलिस कर्मचाऱ्याची दुचाकी चोरट्यांनी चोरुन नेली. (Thieves stole policeman bike from outside DySP house jalgaon crime news)

शहरभर आपल्या कारवाईने अवैध व्यावसायिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या या परिवीक्षाधीन डीवायएसपींच्या दारातूनच चोरट्यांनी वाहन लंपास केल्याने चर्चेला उधाण आले आहे.

जळगाव जिल्‍हा पोलिस दलास सध्या दोन परिविक्षाधीन डीवायएसपी लाभले आहेत. अप्पासाहेब पवार आणि श्री. कुळकर्णी या दोघा प्रशिक्षणार्थी डिवायएसपींनी जळगाव उपविभागात अवैध धंद्यांविरूद्ध कारवाईचा सपाटाच सुरु केला आहे.

गुटखा, पानमसला, वाळूसह अवैध व्यवसायांवर सलग कारवाई सुरु असल्याने अवैध व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण आणि जनसामान्यांमध्ये दोघांची बऱ्यापैकी चर्चा आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

परिविक्षाधीन कालावधीत शासकिय निवासस्थान उपलब्ध नसल्याने श्री. पवार हे मानराजपार्क परिसरातील द्रौपदीनगर येथे भाडेतत्त्वावरील घरात वास्तव्याला आहेत.

त्यांच्याकडे कार्यरत पोलिस कर्मचारी हिरालाल गुमळकर (रा. पोलिस वसाहत) हे शनिवारी (ता. २७) सायंकाळी सातला खासगी दुचाकी (एमएच १९, बीएक्स ५५९२)द्वारे ड्युटीवर आले होते. वाहन बंगल्याबाहेरच उभे करुन ते रात्रभर ड्युटीवर होते.

पहाटे सहाला घरी जाण्यासाठी वाहन शोधत असताना दुचाकी न आढळल्याने त्यांनी चौकशी केली. तरीही वाहन सापडत नसल्याने अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची खात्री झाल्यावर त्यांनी जिल्‍हापेठ पोलिस ठाणे गाठत या प्रकरणी तक्रार दिली. त्यावरून गुन्ह्याची नोंद झाली असून, पोलीस नाईक जुबेर तडवी तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSMT: सीएसएमटी स्थानकात लोकल रुळावरुन घसरली; सलग दुसरी घटना घडल्यानं खळबळ

Shashi Tharoor T20 WC 2024 : माझा मतदारसंघ करणार वर्ल्डकपमध्ये प्रतिनिधित्व.... शशी थरूर भारतीय संघाची घोषणा होताच हे काय म्हणाले?

Poorest Politicians: भारतातील सर्वात गरीब 'पुढारी' कोण आहेत? ज्यांच्याकडे आहे फक्त 1,700 रुपयांची मालमत्ता

Latest Marathi News Live Update: उद्धव ठाकरेंची विकेट आधीच पडलीए, ते क्लीनबोल्ड झालेत; CM शिंदेंना विश्वास

Rupali Ganguly: वेट्रेस म्हणून केलं काम, गाजवला छोटा पडदा अन् आता भाजपमध्ये प्रवेश; जाणून घ्या अनुपमा फेम रुपाली गांगुलींबद्दल

SCROLL FOR NEXT