Jalgaon Crime news esakal
जळगाव

Jalgaon Crime News: चोरट्यांचा देवावर डोळा; मंदिरातील देवीचे चांदीचे डोळे चोरले

सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव : वाघळी (ता. चाळीसगाव) येथील श्री मुधाई देवीच्या मंदिरातील देवीचे डोळे गेल्या आठ दिवसांपूर्वी चोरीला गेले असल्याची कुजबूज व दबक्या आवाजात चर्चा वाघळी गावात पसरली. याबाबत आमच्या प्रतिनिधीने देवीच्या मंदिराला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता डोळे चोरीला गेल्याच्या घटनेला नाव न सांगण्याच्या अटीवर दुजोरा दिला.

दरम्यान, वाघळी गावाला समक्ष भेट दिल्यानंतर एका ग्रामस्थाची भेट घेतली. त्याने नाव न छापण्याच्या अटीवर माहिती दिली. चोरी झाली आहे हे खरे आहे, मात्र चाळीसगाव येथील ग्रामीण पोलिस ठाण्याचे चार, पाच पोलिस आमच्या गावात आले होते, त्यांनी गावातील पोलिस पाटील यांची व गावातील इतर मान्यवरांची भेट घेतली आणि गावाची बदनामी होऊ नये, म्हणून आजपर्यंत काहीच कारवाई केली नाही.

याबाबत अधिक तपास केला असता, हे मंदिर छत्रपती संभाजीनगर येथील केंद्र सरकारच्या भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण मंडळाच्या अखत्यारित आहे. या मंदिरावर एका सुरक्षारक्षकची नियुक्ती केलेली आहे. मात्र तो कधीच येथे येत नाही. त्याने वाघळी गावातील एकाची नियुक्ती केलेली आहे. त्याला तो पगार देतो. तसेच वाघळी गावातील एक पुजारी गेल्या कित्येक वर्षांपासून रोज पूजा करून निघून जातो.

यासंदर्भात येथील ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांची समक्ष भेट घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी बुधवारी (ता. २३) भेट घेण्यासाठी गेले असता त्यांची भेट होऊ शकली नाही. मात्र तेथील गोपनीय शाखेच्या पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. आता पोलिस काय कारवाई करतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishalgad Qurbani Permission : किल्ले विशाळगडावर उरुस काळात सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी देण्यास बंदी; मांसाहार नेण्याबाबत कोर्टाचा काय आहे आदेश?

Vishnu Sahasranama: अधिक मासात विष्णू सहस्त्रनामाचा जप का करतात? रोजही वाचण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत आयपीएल क्रिकेट बेटिंग प्रकरणी भाजपच्या नगरसेवकाला अटक

Pargaon News : अष्टविनायक महामार्गावर अनेक ठिकाणी डांबर उखडून पडले खड्डे; तर महामार्गावरील अनेक बसथांब्यांची दुरावस्था झाली आहे

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

SCROLL FOR NEXT