Marriage sakal
जळगाव

यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी ६३ मुहूर्त

२० नोव्हेंबरपासून उडणार लग्नाचे बार

सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः दिवाळीनंतर तुलसीविवाह होतो. त्यानंतर विवाह समारंभ सुरू होतील. पुढील महिन्यात तुलसीविवाहानंतर इच्छुक वधू-वरांच्या लगीनघाईला सुरवात होणार आहे. यंदा २० नोव्हेंबरपासून सनई-चौघडे वाजण्यास सुरवात होऊन ९ जुलै २०२२ पर्यंत लग्नसोहळे पार पडणार आहेत. यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी तब्बल ६३ मुहूर्त असून, विवाहासाठी पालकांना सोयीनुसार मुहूर्त ठरविता येणार आहे.

१५ ते १९ नोव्हेंबरदरम्यान तुलसीविवाह होताच लग्नसमांरभाला सुरवात होईल. गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मर्यादित व्यक्तींच्या उपस्थितीत मोजकेच विवाह पार पडले. कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्याने यंदा मात्र विवाहाची सनई निर्विघ्न पार पडणार आहे. यंदा नोव्हेंबरमध्ये चार, डिसेंबरमध्ये ११, जानेवारीत पाच, फेब्रुवारीत सहा, मार्चमध्ये चार, एप्रिलमध्ये सहा, मेमध्ये ११, जूनमध्ये दहा व जुलैत सहा विवाह मुहूर्त आहेत. यंदा नोव्हेंबर व मार्चमध्ये सर्वांत कमी चार विवाह तिथी आहेत. वेगवेगळ्या पंचांगांनुसार मुहूर्त कमी-अधिक होतात.

अनेक जण आतापासूनच तयारीला लागले आहेत. वधू-वरांची पसंती झाल्यानंतर मंगल कार्यालये, केटरर्स, डेकोरेशन बुकिंग करीत आहेत. सध्या मुला-मुलीच्या पसंतीचा कार्यक्रम सुरू असून, मध्यस्थांमार्फत सोयरीक जुळविली जात आहे. मानपान, आहेर, मंगल कार्यालय, पत्रिका, आचारी, वाहनांचे बुकिंगही सुरू झाले आहे. अवघ्या महिनाभरावर यंदाचा पहिला मुहूर्त असल्याने बाजारपेठेत सध्या लग्नाच्या खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. यामुळे दिवाळीनंतर बाजारपेठेत पुन्हा गर्दी पाहायला मिळणार आहे.

यंदाचे लग्न मुहूर्त

नोव्हेंबर ः २०२१ ः २०, २१, २९, ३०; डिसेंबर ः १, ७, ८, ९, १३, १९, २४, २६, २७, २८, २९; जानेवारी ः २०२२ ः २०, २२, २३, २७, २९; फेब्रुवारी ः ५, ६, ७, १०, १७, १९; मार्च ः २६, २७, २८; एप्रिल ः १५, १७, १९, २१, २४, २५; मे ः ४, १०, १३, १४, १८, २०, २१, २२, २५, २६, २७; जून ः १, ६, ८, ११, १३, १४, १५, १६, १८, २२; जुलै ः ३, ५, ६, ७, ८, ९.

"दिवाळीनंतर २० नोव्हेंबरपासून लग्नसराईला सुरवात होईल. कोरोनाचे सावट दूर झाले आहे. विवाह समारंभांना दोनशे लोकांची अट रद्द झाली तरच धूमधडाक्यात विवाह होतील. ९ जुलैपर्यंत लग्नाचे ६३ मुहूर्त आहेत."

-बाळकौंडिण्य गुरुजी, भटजी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: हार्दिक पांड्या-माहिका शर्मा दिवाळी सेलिब्रेशनसाठी केलं 'मॅचिंग मॅचिंग'; रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण

Diwali Celebration : वसई विरार मध्ये शिवरायांच्या किल्ल्याचे दर्शन; ठीक ठिकाणी उभारण्यात आले आहेत इतिहास कालीन किल्ले

Balipratipada and Padwa 2025: बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा एकाच दिवशी का साजरा करतात? जाणून घ्या शुभ मुहूर्त

Fursungi Nagar Parishad Election : फुरसुंगी नगरपरिषद निवडणुकीसाठी महापालिकेचे ३५ कर्मचारी नियुक्त

Nagpur News: नागपूरला विकासाची नवी गती मिळणार, तिसरा रिंगरोड मल्टीमॉडल कॉरिडॉर बनणार; मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

SCROLL FOR NEXT