threatening esakal
जळगाव

Jalgaon News : "तुझे दोन साक्षीदार मी फोडून टाकले आहे..." साक्ष देणाऱ्या पिता-पुत्रास धमकी

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : माझ्याविरोधात साक्ष देतो का देतो, तुला बघून घेईन, अशी धमकी देत वृद्धाला शिवीगाळ करण्यात आली. ही घटना जळगाव जिल्हा न्यायालयाच्या गेटबाहेर घडली. (Threats to father and son testifying in court jalgaon news)

शहरातील गणेश कॉलनीतील रमेश तानाजी पाटील (वय ६३) यांची गेंदालाल मिलमधील अजीज खान ऊर्फ बाबा बाबू खान यांच्याविरोधात न्यायालयातील खटल्यात सुनावणी सुरू आहे. सोमवारी (ता. २३) न्यायालयाची तारीख असल्याने रमेश पाटील मुलासह हजर होते.

न्यायालयात कामकाजादरम्यान साक्ष नोंदविल्यानंतर ते न्यायालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर अजिजखान ऊर्फ बाबा बाबू खान याने रमेश पाटील व त्यांच्या मुलाला उद्देशून ‘तुझे दोन साक्षीदार मी फोडून टाकले आहेत’, आता तू व तुझा मुलगा बाकी आहे, तुम्हाला पण बघून घेईन, अशी धमकी देऊन शिवीगाळ केली.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

याप्रकरणी रमेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात अजिजखान ऊर्फ बाबा बाबू खान यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Army Harassment: वरिष्ठांचा त्रास, जवानाने जीव संपवला ; लष्करी वसाहतीतील घटना, दोघांवर गुन्हा दाखल

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Asian Games: तिरंदाजीत भारताची 'गोल्डन हॅट्रिक'! महिलांपाठोपाठ पुरुष संघाचेही वर्चस्व; तर नेमबाज नीरु धंडा-कायनान चेनाईचा सुवर्णवेध

Ratnagiri Tourism : ‘थ्रीडी शो’ अन् ‘शिवसृष्टी’ तोट्यात, उत्पन्न ८ लाख तर खर्च ९ लाख; नावीन्यपूर्ण उपक्रम ठरताहेत ‘पांढरा हत्ती’

Corruption Case : पूजा खेडकरच्या वडिलांच्या घरावर छापा, कोट्यवधींची बेहिशोबी मालमता; उत्पन्नाच्या १०३ टक्के जास्त माया जमवली कशी?

SCROLL FOR NEXT