cyber crime sakal
जळगाव

Cyber Crime : अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी ; गृहस्थाला मागितली खंडणी

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील जुने जळगाव परिसरातील गृहस्थाला अनोळखी व्यक्तींनी मोबाईलवर संपर्क साधून त्याचा अश्लील व्हिडिओ तयार करून तो व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडे पैशांची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, जळगाव सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहरातील जुने जळगावातील वास्तव्यास असलेल्या प्रमोद रघुनाथ डोंगरे (वय ४०) याला मुलीच्या नावाने फेसबुकवर फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठविली. मेसेंजरद्वारे या गृहस्थाला मेसेज पाठवून व्हॉट्सॲप क्रमांक मिळविला.(Threats to make pornographic videos viral Ransom demanded from the householder Jalgaon Crime News)

त्यानंतर त्याच्या मोबाईल क्रमांकावर शनिवारी (ता. ८) व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल करून अश्लील व्हिडिओ तयार केला. नंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत २० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. त्रस्त गृहस्थाने सायबर पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली असून, संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Gas Connection : महिन्यात ४० हजार पाईप गॅस कनेक्शन; कोल्हापूर शहरात राजारामपुरीसह काही उपनगरांत जोडणी पूर्ण

Latur Accident: चाकूरमध्ये भीषण अपघात; सिमेंट मिक्सरखाली येऊन नगरपंचायती कर्मचारी ठार

South Africa vs New Zealand: दक्षिण आफ्रिकन संघाची विजयी सलामी; न्यूझीलंडवर सात विकेट राखून मात; मोकोएना ठरला सामनावीर

Kolhapur Scam : गॅस कनेक्शन बंद होण्याच्या; नावाखाली फसवणुकीचा धोका, पुणे - मुंबईतील सायबर गुन्हेगार झाले सक्रिय

Latest Marathi Update : पुण्यात घरगुती सिलिंडरसाठी मोठ्या रांगा

SCROLL FOR NEXT