Railway  esakal
जळगाव

Jalna Jalgoan Railway Line : जालना- जळगाव रेल्वेमार्गासाठी साडेतीन हजार कोटी; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

सकाळ वृत्तसेवा

Jalna Jalgoan Railway Line : अनेक वर्षांपासून प्रलंबित मागणी असलेल्या जालना- जळगाव ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत साडेतीन हजार कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली. या मंजुरीमुळे मराठवाडा- खानदेशला जोडणारा दुवा निर्माण होणार आहे. (Three and half thousand crores for Jalna Jalgaon railway line funds approved jalgaon news)

जालना- जळगाव या सुमारे १७४ किलोमीटरच्या टप्प्यासाठी ब्रॉडगेज रेल्वेमार्गाचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून प्रलंबित असून दोन्ही विभागातील प्रवाशांची ही आग्रही मागणीही होती.

या कामासाठी ७ हजार १०५ कोटी ४३ लाखांचा खर्च अपेक्षित असून त्यापैकी केंद्र व राज्य सरकार प्रत्येकी ५० टक्के खर्च देणार आहे. त्यानुसार राज्याचा ३ हजार ५५२ कोटी ७१ लाखांचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाने या निधीस मंजुरी दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

असा असेल मार्ग

जालना- जळगाव हा मराठवाडा व खानदेश विभागाला जोडणारा मार्ग जालना- राजूर- सिल्लोड- अजिंठा- जळगाव असा असेल. जळगावपासून अवघ्या ५५ किलोमीटरवर असलेल्या जागतिक दर्जाच्या पर्यटनस्थळ अजिंठा लेणीवरुन मार्ग जात असल्याने पर्यटनात भर पडले. तसेच या मार्गावर पवित्र तीर्थक्षेत्र राजूर गणपतीही आहे. त्यामुळेही या मार्गाचे विशेष महत्त्व आहे.

या मार्गाद्वारे मराठवाड्याला थेट मुंबई, दिल्ली व कोलकत्ता या महत्त्वाच्या मार्गांशी जोडता येणार आहे. म्हणूनच या ब्रॉडगेज रेल्वेमार्गाच्या कामाला गती देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

Mhaisal Canal Accident : कवठेमहांकाळमध्ये दुर्दैवी घटना! म्हैसाळ योजनेच्या कालव्यात कार कोसळून तरुण गेला वाहून; रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

SCROLL FOR NEXT