Death esakal
जळगाव

Jalgaon Accident News : रावेर येथे रेल्वेतून पडून तरुणांसह तिघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Accident News : येथे रेल्वेतून पडून तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. २) घडली. याबाबत रावेर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

येथील जी. आय. कॉलनीतील रहिवासी व महसूल विभागातील निवृत्त शिपाई रतन राजाराम भालेराव (वय ६३) हे सकाळी साडेअकराच्या सुमारास रेल्वेने भुसावळकडे जात असताना रेल्वेतून तोल जाऊन रेल्वेखाली आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. (Three die after falling from train at Raver jalgaon accident news)

याबाबत मनोज भालेराव यांनी रावेर पोलिस ठाण्यात माहिती दिली. हवालदार अर्जुन सोनवणे पुढील तपास करीत आहेत.

रेल्वेतून पडून दोघांचा मृत्यू

दुसऱ्या घटनेत खंडवा येथून भुसावळ येथे विवाह कार्यक्रमात वाद्य वाजविण्यासाठी जाणाऱ्या दोन तरुणांचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू ओढवला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रावेर ते अजंदा गावादरम्यान खंबा क्रमांक १७५ जवळ दोन तरुण धावत्या रेल्वेतून तोल जाऊन पडले.

त्यापैकी आकाश किशोर वेद (वय ३५) याचा जागेवरच मृत्यू झाला तर मोनू बल्ला मुडेला (वय ३०) हा रेल्वेतून पडून गंभीर जखमी झाल्याने त्यास भुसावळ येथे उपचारार्थ नेण्यात आले. उपचार सुरू असताना त्याचाही मृत्यू झाला. याबाबत तरुण सुरेश नागिले (रा. खंडवा) यांनी दिलेल्या माहितीवरून रावेर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT