Business Success
Business Success esakal
जळगाव

Business Success : कुटुंब संस्कारातून संसाराची घडी अन्‌ व्यवसायात भरारी! नवलखा परिवाराची यशोगाथा

सकाळ वृत्तसेवा

Business Success : पणजोबा-आजोबांच्या संस्कारांतून उभारलेला व्यवसाय त्यांच्याच मार्गदर्शक तत्त्वावर सुरू आहे. त्यातून व्यवसायातील वृद्धी साधली जातेय. हेच संस्कार आमचे कुटुंब एकत्रित ठेवण्यातही कामी येत असून, त्यातून संसाराचा वटवृक्षही स्नेहाची शीतल छायाही देतोय.

ज्वेलरी व्यवसायात नावारूपास आलेल्या नवलखा परिवाराची ही यशोगाथा व्यावसायिक क्षेत्रात आदर्श ठरावी. (Through family culture world full of life and business Success story of Navlakha family jalgaon news)

जामनेरचे केशरीमल राजमल नवलखा यांचा मूळ व्यवसाय शेती. कमी वयात त्यांच्यावर कुटुंब आणि शेतीची मोठी जबाबदारी आली. मात्र, धीरोदात्त केशरीमल यांनी ही जबाबदारी लीलया सांभाळली.

अगदी वयाच्या पंधराव्या वर्षांपासून त्यांनी त्यांच्या नावाने म्हणजेच ‘केशरीमल राजमल नवलखा ज्वेलर्स’ म्हणून जामनेरात सोने-चांदीच्या दागिन्यांचा व्यवसाय सुरू केला. ग्राहकांच्या विश्‍वासाच्या बळावर व्यवसायाचा विस्तार झाला.

चौथ्या पिढीपर्यंत एकत्रित व्यवसाय

केशरीमल यांना प्रकाशचंद व महेंद्रकुमार ही दोन मुले व दोन मुली. वडिलांच्या आदर्श तत्त्वांवर या दोन्ही भावांनी पुढे व्यवसायाची धुरा सांभाळली. व्यवसाय वृद्धी करीत असताना, ग्राहकांच्या विश्‍वासाला तडा जाऊ दिला नाही.

पुढे प्रकाशचंद व महेंद्रकुमार यांची मुलेही या व्यवसायाचे काम पाहू लागली. परिवाराच्या वृक्षाच्या शाखा वाढत असताना, कुटुंब एकत्रित राहणे, हे नवलखांसाठी महत्त्वपूर्ण ठरले. या व्यवसायात नवलखांची चौथी पिढी आता जोमाने कामाला लागली आहे.

विश्‍वासाला आधुनिकतेचा साज

जामनेरात दागिन्यांचे उत्पादन व होलसेलचा व्यवसाय पुढे जाऊन नवलखा कुटुंबातील नव्या चौथ्या पिढीने रिटेल स्वरूपात नावारूपास आणला. प्रकाशचंद व महेंद्रकुमार यांची मुले व त्यांचे नातूही आता या व्यवसायात आपापले योगदान देत आहेत.

प्रकाशचंद यांना प्रदीप मुलगा व सपना, वंदना या दोन मुली, तर महेंद्रकुमार यांना मोहीत मुलगा व पूजा ही मुलगी. प्रदीप यांचे पुत्र आदित्य. ही केशरीमल यांच्या परिवारातील चौथी पिढी या व्यवसायाची धुरा आता सांभाळतेय.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

प्रदीप नवलखा सीए आहेत; पण त्यांनी प्रॅक्टिस न करता व्यवसायावर लक्ष केंद्रित केलंय. आदित्य यांनी नवलखांच्या विश्‍वासार्ह ज्वेलरीला आधुनिकतेचा साज चढवला आहे. मूळच्या नवलखा फर्मला ९० वर्षांहून अधिक काळ झाला असून, या पेढीची शतकाकडे वाटचाल सुरू आहे.

२००० पासून जळगावातही उत्पादनासह होलसेलचा व्यवसाय सुरू केला असून, राज्यासह छत्तीसगड, मध्य प्रदेशातूनही नवलखांच्या उत्पादन, ज्वेलरींना मागणी आहे. २०२० पासून जळगावात ‘नवलखा हाउस ऑफ ज्वेलरी’ ही फर्म सुरू केली. तीही लौकिकप्राप्त झाली आहे.

सर्व संमतीमुळे टळते व्यवसायात नुकसान

एकत्र कुटुंब असल्याने कौटुंबिक व व्यावसायिक निर्णय सर्व संमतीने घेतले जातात. सर्व संमतीने घेतलेल्या निर्णयामुळे व्यवसायात संभाव्य नुकसान टळते, याचा अनेकदा अनुभव आल्याचे आदित्य सांगतात.

कुटुंबातील महिला हा मोठा परिवार एकत्रितपणे राहू देण्यात मोलाचे योगदान देत आहेत. मतभेदांवर सामंजस्याने मात करत कुटुंबाची वाटचाल सुरू आहे.

"कुटुंबावर व व्यवसायावर मोठ्या आजोबांचे सदैव लक्ष असते. जामनेर असो की जळगावच्या फर्म, प्रत्येक व्यवहारावर त्यांची बारीक नजर असते. त्यांच्या शब्दाबाहेर कुटुंबातील एकही सदस्य जाण्याचे धाडस करीत नाही. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कुटुंब व व्यवसाय एकत्र आहे."

-आदित्य नवलखा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Traffic advisory : मुंबईत PM नरेंद्र मोदींची जाहीर सभा; गर्दी टाळण्यासाठी वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Cotton Seeds : पहिल्याच दिवशी कपाशी बियाण्यांचा अत्यल्प पुरवठा; आजपासून कापूस बियाणे विक्रीचा होता मुहूर्त

MS Dhoni: धोनी RCB ला देणार सरप्राईज? CSK ने शेअर केलेल्या त्या व्हिडिओने चर्चांना सुरुवात

Share Market Today: अमेरिकन बाजार विक्रमी उच्चांकावरून कोसळले; भारतीय शेअर बाजारात कशी असेल स्थिती?

Devendra Fadnavis: "सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप चुकीचे नव्हते, तेव्हा..."; देवेंद्र फडणवीसांनी मनातलं बोलून दाखवलं

SCROLL FOR NEXT