Traffic congestion at Tower Chowk. esakal
जळगाव

Jalgaon News : टॉवर चौकात वाहतूक विभागाला अपघाताची प्रतिक्षा? शहरवासीय संतप्त

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : टॉवर चौकात असलेला वाहतुकीचा थांबा जुन्या बसस्थानकात हलविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तसेच महापालिका आयुक्तांनी पत्र दिले. परंतु वाहतूक विभाग अद्यापही कार्यवाही करीत नाही.

त्यामुळे या ठिकाणी वाहतूक विभागाला अपघाताची प्रतिक्षा आहे काय? असा प्रश्‍न शहरवासियांकडून उपस्थित केला जात आहे.(towns people are angry due to huge traffic at Tower chowk jalgaon news)

छत्रपती शिवाजी नगर पूल वाहतुकीस सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागात जाणाऱ्या नागरिकांसाठी पुलाजवळ टॉवर चौकात बस थांबा करण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी भररस्त्यावर ग्रामीण भागात जाणारे नागरिक उभे असतात.

या ठिकाणी बसेसही भर रस्त्यावर उभ्या होऊन प्रवासी घेतात. तसेच भररस्त्यावर कालीपिली गाड्याही प्रवासी घेण्यासाठी थांबलेल्या असतात. यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असते.

पुलाच्या चढती- उताराला अडचण

पुलाच्या जवळच थांबा असल्यामुळे या ठिकाणी पुलावरून येणाऱ्या व पुलावर चढण्याऱ्या वाहनधारकांची मोठी अडचण होत असते. शिवाय याच पुलाजवळून एक मार्ग श्‍यामाप्रसाद मुखर्जी उद्यानाकडे जातो तर एक मार्ग जिल्हा परिषदेकडे जातो. त्यामुळे या ठिकाणीही वाहनांची कोंडी होत असते.

दररोज वाहतूक कोंडीचा सामना

पुलाजवळच असलेला बसस्टॉप, प्रवासी घेण्यासाठी उभ्या असलेल्या कालीपिली वाहने त्यामुळे दररोज या ठिकाणी सकाळी व सायंकाळी वाहतूक कोंडी होत असते. तब्बल अर्धा ते एकतास वाहतुकीचा खोळंबा होत असतो. त्यामुळे या ठिकाणी असलेला बसथांबा हलविण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती.

जिल्हाधिकारी, आयुक्तांचे पत्र

टॉवर चौकातील बसस्टॉप जुन्या बसस्थानकात हलविण्याबाबत जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांनी शहर वाहतूक विभागाला पत्र दिले आहे. त्याला तब्बल महिना झाला आहे,परंतु वाहतूक विभागाने अद्यापही बसस्टॉप हलविण्याची कार्यवाही केलेली नाही.

बसस्टॉप जुन्या बसस्थानकात हलविण्यात यावा, तसेच ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेस जुन्या स्थानकाच्या मार्गाने काढण्यात याव्यात, असे आदेशही देण्यात आले आहेत. परंतु त्याबाबत अद्यापही शहर वाहतूक विभागाने कार्यवाही केलेली नाही.

वाहतूक विभाग सुस्त

टॉवर चौकात वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. अनेक वेळा या ठिकाणी लहानमोठे अपघात होऊन वादही झाले आहेत. एखाद्या वेळेस याच ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच अपघाताची शहर वाहतूक विभागाला प्रतिक्षा आहे काय?

असा प्रश्‍नही आता निर्माण झाला आहे. दरम्यान, शहर वाहतूक विभागाने ताबडतोब या ठिकाणी असलेला बसथांबा जुन्या बसस्थानकात हलविण्याची कार्यवाही करण्याची गरज आहे. अन्यथा या ठिकाणी अपघात झाल्यास शहर वाहतूक विभागावर जबाबदारी असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT