Dengue sakal
जळगाव

जळगाव : तीन महिन्यांत डेंगीच्या ४५ बालकांवर उपचार

शासकीय रुग्णालय : प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बालरोग व चिकित्सा विभागाकडून गेल्या तीन महिन्यात सुमारे ४५ डेंगी बाधित बालकांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहे. यामुळे गोरगरीब, ग्रामीण भागातल्या रुग्णांना मोठा आधार मिळाला आहे. डेंगीसदृश लक्षणे दिसल्यास बालकांना रुग्णालयात तपासणीसाठी आणावे, असे आवाहन विभागाने केले आहे.

गेल्या तीन महिन्यापासून जिल्ह्यात डेंगी आजाराने शिरकाव केला असून नागरिक त्रस्त झालेले आहेत. पालकांनी बालकांचा डेंगीपासून बचाव व्हावा यासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. डेंगीची लक्षणे जाणवू लागल्यावर नागरिकांनी त्यांचा मुलांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे तपासणी केली. पर्यायाने ज्यांना अधिक उपचारांची गरज होती, त्यांना बालरोग विभाग क्रमांक चार येथे दाखल करण्यात आले. तेथे विभागप्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोशे यांच्यासह त्यांच्या टीमने यशस्वी उपचार केले.

बालरोग विभागात अद्ययावत सुविधा प्राप्त झाल्या आहेत. तीन महिन्यात ४५ बालकांपैकी १० गंभीर रुग्णांनादेखील वेळीच उपचार मिळाल्यामुळे जीवदान लाभले आहे. डेंगी होऊ नये याकरिता घराची स्वच्छता ठेवावी, डास येणार नाही याची काळजी घेत आहार पौष्टिक असावा. लक्षणे दिसल्यास शासकीय रुग्णालयात सकाळी ओपीडीमधील कक्ष क्र. ३०१ येथे तर दुपारी कक्ष ४ येथे बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवावे, अशी माहिती विभाग प्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोशे यांनी दिली. रुग्णांवर डॉ. सुरोशे यांच्यासह डॉ. गिरीश राणे, डॉ. अतुल गाजरे, डॉ. शिवहर जनकवाडे, डॉ. स्नेहा पल्लोड, डॉ. विश्वा भक्ता, डॉ. नीलांजना गोयल यांनी उपचार केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 2nd T20I: 'Toss' चा 'BOSS'! श्रेयस अय्यरने नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; वरूण चक्रवर्तीला नेमकं काय झालं? BCCI म्हणते...

Pune News : पुण्याच्या चारीही दिशांना स्वतंत्र डंबर प्लांट उभारा; महापौर नागपुरे यांचे आयुक्तांना पत्र

Hingoli News : चोंडीत शक्तिपीठ महामार्गाची मोजणी रोखली! ‘जमीन गेली तर जगायचे कसे?’ वृद्ध महिला शेतकऱ्यांचा आक्रोश; तुषार जाधव यांचा पालकमंत्र्यांना थेट इशारा

IND vs AFG 2nd T20I: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, तरीही संघात एक बदल! भारताच्या Playing XI मध्ये कोणाची एन्ट्री?

AI Powered Cancer Diagnosis: तंबाखू, प्रदूषण की केमिकल? DNA पाहून कॅन्सरचं ‘खरं कारण’ शोधणार आता AI!

SCROLL FOR NEXT