Tree fire esakal
जळगाव

वीज कोसळल्याने भरपावसात पेटले झाड; मोठा अनर्थ टळला

सकाळ वृत्तसेवा

नांद्रा (ता. पाचोरा) : पाचोरा तालुक्यात शनिवारी (ता. १०) शहरासह ग्रामीण भागात मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी दुर्दैवी घटना देखील घडल्या. नांद्रा येथे रात्रीच्या सुमारास येथे निंबाच्या झाडावर वीज पडल्याने झाडाने भर पावसात पेट घेतला. सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे.


नांद्रा येथील डॉ. दीपक सूर्यवंशी यांच्या गट क्रमांक १५९ गावाजवळील पाटचारीजवळ असलेल्या लिंबाच्या झाडावर पाऊस सुरु असताना वीज पडली. त्यामुळे झाडाने भर पावसात पेट घेतला. सुदैवाने जवळपास कोणी नसल्यामुळे अनर्थ टळला. शंभर वर्षांहून अधिक काळापासून असलेल्या या निंबाच्या झाडावर वटवाघूळ पक्ष्यांचे वास्तव्य होते. म्हणून या निंबाच्या झाडाला वटवाघूळचा निंब म्हणून ओळखले जात होते. आता या निंबाच्या झाडावर वीज पडल्याने ते झाड जमिनदोस्त होणार असून, ती जुनी ओळख मिटणार असल्याचे दुःख ग्रामस्थांनी बोलून दाखवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

SCROLL FOR NEXT