जळगाव

Dasara 2023 : विजयादशमीला नागरिकांकडून ‘सोन्या’ची लूट; सुवर्णबाजारात कोटींची उलाढाल

सकाळ वृत्तसेवा

Dasara 2023 : साडेतीन मुहूर्तापेकी एक विजयादशमीच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी (ता. २४) सोन्यासह दूचाकी, चारचाकी वाहने, टी. व्ही., फ्रीज, मोबाईल, विविध सूखवस्तू, कपडे आदींची मोठी विक्री झाली. कोट्यवधींची उलाढाल यातून झाल्याची माहिती बाजारपेठेतील सूत्रांनी दिली. सोन्याचे महाराष्ट्रायीन, पेशवाई, इटालियन आदी प्रकारचे दागीने, सोन्याच्या चिप्सला मोठी मागणी होती.

विजया दशमी अर्थात्‌ दसरा हिंदू बांधव देशभरात मेाठ्या उत्साहात साजरा करतात. या दिवशी नवीन कपडे घालून नागरिकांनी एकमेकांना आपट्याची पाने देवून शुभेच्छा दिल्या. सण असल्याने घरोघरी गोडधोड पदार्थ भोजनात होते. (Turnover of crores in gold market on dasara jalgaon news)

सोशल मिडीयाचा वापर अनेकांनी करीत सकाळपासूनच वाटसअप, इ-मेलवर विजया दशमीच्या शुभेच्छांचे संदेशांची देवाण घेवाण सूरू होती. सायंकाळी काही ठिकाणी रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनाचे कार्यक्रम झाले. आकर्षक आतीषबाजीने नागरिकांचे लक्ष वेधले होते.

विजयादशमीला सोने खरेदी केल्यास ते मोडण्याची वेळ येत नाही. ते चिरकाल टिकते अशी श्रद्धा अनेकांची आहे. यामुळे अनेकांनी कुटूंबियांसोबत सोन्याचे दागीने घेण्यासाठी शहरातील नवलखा ज्वेलर्स, रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स, भंगाळे गोल्ड या सोन्याच्या शो-रूमध्ये खरेदीसाठी सकाळपासूनच गर्दी केली होती.

सोन्याच्या दरात काही दुकानांत शंभर- दोनशे रूपयांचा फरक होता. तरीदेखील विविध शोरूममध्ये दिवसभर ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी होती. सायंकाळी मात्र गर्दीने उच्चांक गाठल्याचे चित्र होते. सुमारे वीस ते पंचवीस किलो सोने विक्री झाल्याचा अंदाज सराफ व्यावसायीकांनी वर्तविला आहे.

नवीन वाहनांसाठी गर्दी

विजया दशमीच्या मुहूर्तावर नवीन वाहन घरी नेण्यासाठी नागरिकांनी दूचाकी, चारचाकी वाहनाच्या शोरूमवर गर्दी केली होती. फोकस ह्युंडाई, सातपूडा मोबाईल, टीव्हीएस शोरूम आदी ठिकाणी दूचाकी व चारचाकी वाहन घेण्यासाठी सकाळपासूनच अनेक कुटूंबिय दाखल झाले होते.

नवीन गाडी घेतल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. सुमारे बाराशे दोन्ही प्रकारची वाहने विक्री झाल्याचे सांगण्यात आले.

"ग्राहकांचा सोन्याची दागिने खरेदीस चांगला प्रतिसाद होता. आमच्याकडे पेशवाई, इटालियन, कास्टिंग, रोज गोल्ड, अँटिक अशा विविध प्रकारचे सोन्याचे दागिने असल्याने ग्राहकांची त्याला अधिक पसंती होती. दिवसभर ग्राहकांची गर्दी होती." -आदित्य नवलखा, संचालक, नवलखा ज्वेलर्स, जळगाव.

"दसरा अन्‌ सोने खरेदी असे नाते अनेक वर्षापासून जोडले गेले आहे. विजयादशमीच्या मुहूर्तावर सकाळपासूनच ग्राहकांनी खरेदी सुरू केली. चांगला प्रतिसाद मिळाला. महिला वर्गाची विशेष दागीन्यांना पसंती होती." -मनोहर पाटील, जनसंपर्क अधिकारी, रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स

"सोन्याचे दागिने खरेदीस चांगला प्रतिसाद मिळाला. महिलांनी ॲंटीक दागिन्यांसोबत विविध प्रकारचे गळ्यातील हार, बांगड्या, मणी मंगळसूत्राला मागणी होती. फॅन्सी दागिन्यांचा दर ५५ हजार ८७५ (विना जीएसटी) होता. तर पिवर सोन्याचा दर ६१ हजार होता." -भागवत भंगाळे, संचालक, भंगाळे गोल्ड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

SCROLL FOR NEXT