Crime Update esakal
जळगाव

Jalgaon Crime News : गावठी पिस्तूलसह शिरपूरमधील दोघे ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

चोपडा (जि. जळगाव) : तालुक्यातील सत्रासेन गावाजवळ शस्त्र खरेदी करून चोपड्याकडे येत असताना कारमधील भोरटेक (ता. शिरपूर) येथील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Two from Shirpur arrested with Gavthi pistol Jalgaon Crime News)

सत्रासेन (ता. चोपडा) गावाजवळील फाट्याजवळ स्विफ्ट डिझायर कारमधील (एमएच ४६-१४३०) संशयित विनापरवाना शस्त्र खरेदी करून विक्री करण्याच्या उद्देशाने येत होते. त्याच वेळी पोलिसांना मिळलेल्या गुप्त माहितीनुसार संशयित असलेले छगन किसन कोळी (वय ७२) व ज्ञानेश्वर मोहन शिरसाठ (वय ४०, रा. भोरटेक, ता. शिरपूर) या दोघांच्या ताब्यातून २५ हजार रुपये किमतीची गावठी बनावटीची स्टीलचे पिस्तूल व तीन लाख रुपये किमतीची कार असा ३ लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित व पिस्तूल ताब्यात घेऊन चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस कर्मचारी शिवाजी बाविस्कर तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खुल्या जागेत कुर्बानी होऊ देणार नाही; धर्माच्या नावाखाली कत्तल सहन करणार नाही, बकरीदपूर्वी भाजप नेत्याचे BMC ला पत्र

Retired Teacher Donation: सेवानिवृत्त शिक्षिकेची एक कोटींची देणगी; विजयाताई वैद्यांचा सैनिकांच्या कल्याणासाठी प्रेरणादायी त्याग

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT