Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime Update : गावठी पिस्तूलसह शिरपूरमधील दोघे ताब्यात; पोलिसांची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

चोपडा : तालुक्यातील सत्रासेन गावाजवळ शस्त्र खरेदी करून चोपड्याकडे येत असताना कारमधील भोरटेक (ता. शिरपूर) येथील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सत्रासेन (ता. चोपडा) गावाजवळील फाट्याजवळ स्विफ्ट डिझायर कारमधील (एमएच ४६-१४३०) संशयित विनापरवाना शस्त्र खरेदी करून विक्री करण्याच्या उद्देशाने येत होते.(Two from Shirpur arrested with Gavthi pistol Police action Jalgaon Crime News)

त्याच वेळी पोलिसांना मिळलेल्या गुप्त माहितीनुसार संशयित असलेले छगन किसन कोळी (वय ७२) व ज्ञानेश्वर मोहन शिरसाठ (वय ४०, रा. भोरटेक, ता. शिरपूर) या दोघांच्या ताब्यातून २५ हजार रुपये किमतीची गावठी बनावटीची स्टीलचे पिस्तूल व तीन लाख रुपये किमतीची कार असा ३ लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी संशयित व पिस्तूल ताब्यात घेऊन चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस कर्मचारी शिवाजी बाविस्कर तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

तो आला आणि माझं आयुष्यच बदललं! रिंकू राजगुरूने दिली प्रेमाची कबुली; शेअर केला तिच्या रोमिओचा फोटो

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

SCROLL FOR NEXT