Hemophilia disease  ( clip art )
Hemophilia disease ( clip art ) esakal
जळगाव

Jalgaon Hemophilia Disease : हिमोफिलिया आजाराचे खानदेशात दोनशेवर रुग्ण; उपचार न मिळाल्याने रुग्णांची हेळसांड

संजय पाटील

Jalgaon Hemophilia Disease : हिमोफिलिया हा अनुवंशिक रक्त दोषामुळे होणारा आजार आहे. या आजाराच्या रुग्णांचा तपास निदान व उपचारासाठी राज्यात केवळ नऊ ठिकाणी केंद्र आहेत.

या रुग्णांमध्ये रक्त गोठण्याचा फॅक्टर ८ आणि फॅक्टर ९ ची कमतरता असते. (two hundred patients of hemophilia disease in Khandesh jalgaon news)

त्यामुळे अतिरक्तस्राव होतो. स्त्रिया या हिमोफिलिया आजाराच्या वाहक असतात तर पुरुषांना याची लक्षणे दिसून येतात, अशा रुग्णांना शिरेद्वारे फॅक्टर देण्यात येतात. दरम्यान, या आजाराने ग्रस्त जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात जवळपास दोनशेच्या वर रुग्ण असून, हे सर्व रुग्ण योग्य व वेळेवर उपचारापासून वंचित आहेत. त्यामुळे अशा रुग्णांसाठी खानदेशात ‘डे केअर सेंटर’ व्हावे, अशी मागणी हिमोफिलिया सोसायटीचे सचिव स्वप्नील पाटील यांनी केली आहे.

दरम्यान, शासन दरबारी वेळोवेळी निवेदन देऊन देखील याबाबत कोणतीही दखल घेतली जात नसल्यामुळे याबाबत आरोग्य मंत्री यांनी लक्ष घालावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. या रोगामुळे रुग्णांना अपंगत्व देखील येते, तसेच एखाद्या व्यक्तीला दुखापत झाल्यास त्याला वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याच्या मृत्यू देखील होऊ शकतो.

या रुग्णांना नेहमीच फॅक्टर ८ व फॅक्टर ९ आणि तसेच इतर रुग्णांसाठी फिबा व नोवो ७ इंजेक्शनची आवश्यकता असते. या औषधाचा साठा अगदी मर्यादित उपलब्ध होत असल्याने रुग्णांची हेळसांड होत असते. दरम्यान, ऐनवेळी दुखापत झाल्यास रुग्णांचे रक्त थांबत नाही. म्हणून धावपळ करावी लागते, जवळपास या तिन्ही जिल्ह्यात कुठेही या रुग्णांना औषध उपचार मिळत नाही.

परिणामी, धावपळ करत नाशिक किंवा मुंबई उपचारासाठी अशा रुग्णांना घेऊन जावा लागते. दरम्यान, इतक्या लांब रुग्णांना घेऊन जाताना एखाद्याचा जीव देखील जाऊ शकतो आणि अशा घटना देखील घडलेल्या आहेत. त्यामुळे अशा हिमोफिलिया आजाराबाबत खानदेशात ‘डे केअर सेंटर’ची उभारणी केल्यास होणाऱ्या आजाराला प्रतिबंध बसेल, तसेच अशा आजारावर ग्रस्त रुग्णांना वेळीच उपचार होईल. परिणामी, रुग्ण दगावणार नाही.

''महाराष्ट्र शासनातर्फे रुग्णांना मोफत औषधोपचार दिले जातात. परंतु या तिन्ही जिल्ह्यात कुठेही या रुग्णांसाठी स्वतंत्र यंत्रणा किंवा विभाग कार्यान्वित नाही. या रुग्णांसाठी जिल्हास्तरावर जिल्हा रुग्णालयात केंद्र सरकारच्या निर्देशनानुसार वेगवेगळे विभाग करून व नियमित लागणारा औषधी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून सुविधा मिळाव्यात.''- स्वप्नील पाटील, सचिव, हिमोफिलिया सोसायटी, धुळे

..इथे मिळतात मोफत उपचार

राज्यात सध्या जिल्हा रुग्णालय ठाणे, नाशिक, सातारा, अमरावती, छत्रपती संभाजी नगर, अहमदनगर, डागा स्री रुग्णालय नागपूर, के. एम. रुग्णालय मुंबई आणि बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथे या आजारावर मोफत उपचारासाठी सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आरोग्य यंत्रणा उदासीन

हिमोफिलिया सोसायटी धुळेचे सचिव स्वप्नील पाटील यांनी जिथे सध्या ९ सेंटर उपलब्ध आहेत, तेथे देखील औषधी कधीच सुरळीत उपलब्ध नसल्याकडे लक्ष वेधले. यात रुग्णांची व त्यांच्या कुटुंबीयांची जी धावपळ होते, त्याला काहीच सीमा नाही. या आजारावरील औषधांसंदर्भातील तरतूद तोडकी आहे. केंद्र सरकारने दिलेल्या निधीचा वापर खरेदी प्रक्रियांमध्ये केला जातो. उपलब्ध निधी ही पुरेसा नसल्याचे त्यांनी सांगितले.

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील बरेच वैद्यकीय महाविद्यालय येतात, त्यांनी देखील या औषध खरेदीचा भार उचलावा, असे आरोग्य विभागाकडून सांगितले जाते. पालिका, सार्वजनिक आरोग्य विभागासह शिक्षण विभागानेही यामध्ये सहभाग द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आरोग्य मंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यात केंद्र स्थापन करून औषधे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. तरीही रुग्णांना पळापळ करावी लागत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : 'म्हाडा'च्या इमारतीचं छत कोसळलं; विक्रोळीत दोन वृद्धांचा मृत्यू

LinkedIn Jobs Alerts : फ्रेशर आहात आणि चांगली नोकरी हवीय तर हे करायलाच हवं; LinkedIn नेच दिलाय लाखमोलाचा सल्ला

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

SCROLL FOR NEXT